Take a fresh look at your lifestyle.

नाशिक महापालिकेतील अग्निशमन, आरोग्य विभागातील भरती ‘या’ महिन्यात…..

0

अग्निशमन व वैद्यकीय विभागाच्या रिक्त पदांच्या भरतीसाठी इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (आयबीपीएस) या संस्थेचा एकमेव प्रस्ताव सादर झाल्याने याच संस्थेमार्फत भरती केली जाणार असून, साधारण जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्रक्रिया सुरू होईल.

कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने तातडीची बाब म्हणून वैद्यकीय आरोग्य तसेच अग्निशमन विभागाची रिक्त पदे भरण्याच्या सूचना दिल्या आहेत. संपूर्ण राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ही पदे भरली जाणार आहे.

मागील महिन्यात राज्य शासनाने या संदर्भात आदेश पारित करून टीसीएस किंवा आयबीपीएस या दोन संस्थांमार्फतच भरती करण्याच्या सूचना दिल्या आहेत. नाशिक महापालिकेचा आस्थापना खर्च 35 टक्क्यांच्या वर असल्याने रिक्त पदांची भरती करता येत नाही.
मात्र, राज्य शासनाने तातडीची बाब म्हणून वैद्यकीय व अग्निशमन विभागाची पदे भरण्यास मंजुरी दिली आहे.

त्याअनुषंगाने नाशिक महापालिकेकडून आयबीपीएस व टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या दोन संस्थांशी पत्रव्यवहार करून प्रस्ताव गेले होते.
त्यातील आयबीपीएस संस्थेने महापालिकेत वैद्यकीय व अग्निशमन विभागात रिक्त पदांची भरती करण्याची तयारी दर्शवली आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या संस्थेचा प्रस्ताव सादर झाला नाही. त्यामुळे आयबीपीएस संस्थेच्या माध्यमातून भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.

“अग्निशमन व वैद्यकीय विभागातील रिक्त पदांची भरती करण्यासाठी आयबीपीएस या संस्थेचा प्रस्ताव सादर झाला असून, यामार्फतच भरती प्रक्रिया राबविली जाईल.”

अग्निशमन व वैद्यकीय विभागाच्या रिक्त पदांच्या भरतीसाठी इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (आयबीपीएस) संस्थेने तयारी दर्शवली असून, यासंदर्भात पुढील आठवड्यात बैठक होऊन जानेवारी महिन्यात नोकरभरतीची प्रक्रिया राबविली जाण्याची शक्यता आहे.

कोरोना पार्श्वभूमीवर राज्य शासनाने तातडीची बाब म्हणून वैद्यकीय आरोग्य तसेच अग्निशमन विभागाची रिक्तपदे भरण्याच्या सूचना दिल्या आहेत. संपूर्ण राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ही पदे भरली जाणार आहे.

मागील महिन्यात राज्य शासनाने या संदर्भात आदेश पारित करून टीसीएस किंवा आयबीपीएस या दोन संस्थांमार्फतच भरती करण्याच्या सूचना दिल्या आहेत. नाशिक महापालिकेचा आस्थापना खर्च ३५ टक्क्यांच्या वर असल्याने रिक्त पदांची भरती करता येत नाही, मात्र राज्य शासनाने तातडीची बाब म्हणून वैद्यकीय व अग्निशमन विभागाची पदे भरण्यास मंजुरी दिली आहे.

त्याअनुषंगाने नाशिक महापालिकेकडून आयबीपीएस व टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या दोन संस्थांशी पत्रव्यवहार करून प्रस्ताव गेले होते. त्यातील आयबीपीएस संस्थेने महापालिकेत वैद्यकीय व अग्निशमन विभागात रिक्त पदांची भरती करण्याची तयारी दर्शवली आहे.

सदर संस्थेने नाशिक महापालिकेला प्रस्ताव दिला असून, या प्रस्तावाचा अभ्यास प्रशासनाच्या मार्फत सुरू आहे. पुढील आठवड्यात आयबीपीएस संस्थेच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक होऊन भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. दरम्यान, टीसीएस कंपनीनेदेखील प्रस्ताव दिल्यास या मार्फतदेखील विचार होणार आहे. दोन्ही संस्थांमार्फत रिक्त पदांची भरती होईल किंवा महापालिकेला परवडेल, अशा एकाच संस्थेच्या माध्यमातून भरती होईल. जानेवारी महिन्यात रिक्त जागा भरल्या जातील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

“अग्निशमन व वैद्यकीय विभागातील रिक्त पदांची भरती करण्यासाठी शासनाने ठरवून दिलेल्या टीसीएस व आयबीपीएस या संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते. यातील आयबीपीएस संस्थेने प्रस्ताव स्वीकारला आहे.

‘या’ ठिकाणी ५५०० आशा सेविकांची भरती करणार; राज्य शासनाची घोषणा
मुंबई महापालिकेच्या शताब्दी रुग्णालयात यापुर्वीच्या काळात औषध खरेदीत चूकीच्या बाबी घडल्या आहेत. औषध दिरंगाईची चौकशी करण्यात येईल. तसेच, ५५०० आशा सेविकांची भरती करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली.

मुंबई कांदिवली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सर्वसाधारण महापालिका रुग्णालयातील सोई सुविधांचा अभाव असल्याकडे लक्ष वेधीत भाजपा आमदार आशिष शेलार यांनी तारांकित प्रश्न उपस्थितीत केला होता. यावर बोलताना आमदार आशिष शेलार म्हणाले की, “या रुग्णालयातील रिक्त पदे तातडीने भरणार का? चुकीची औषध खरेदी व औषध दिरंगाई झाली त्याची चौकशी करणार का?”, असे प्रश्न उपस्थित केलं होतं. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी चौकशी करण्याचे मान्य करुन, रिक्त पदे तातडीने भरण्यात येतील, अशी ग्वाही दिली.
“आशिष शेलार यांनी केलेल्या सूचनेप्रमाणे ५००० स्वच्छता दूत जसे नियुक्त करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे ५५०० आशा सेविकांचीही भरती करण्यात येईल,” अशी घोषणा मुख्यमंत्री शिंदेंनी केली.

या रुग्णालयाबाबतीत सविस्तर चर्चा करण्यासाठी स्वतंत्र बैठक घेण्याची मागणी आमदार अतुल भातखळकर यांनी केली होती. त्यालाही मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली. दरम्यान, पश्चिम उपनगरातील सेव्हन हिल्स रुग्णालय महापालिकेने ताब्यात घ्यावे, अशी मागणी आमदार आशिष शेलार यांनी केली. ती मान्य करीत याबाबत महापालिकेला सूचना करण्यात येतील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या चर्चेत आमदार पराग आळवणी, योगेश सागर सहभागी झाले.