Take a fresh look at your lifestyle.

सामान्यांना दिलासा; आता रुग्णांना रुग्णालयातील औषधं खरेदी करण्याला सक्ती करता येणार नाही

0

औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० व त्याअंतर्गत
सर्व विभागीय सह आयुक्त, सहायक आयुक्त व औषध निरीक्षक (औषधे) यांना कळविण्यात आले आहे की, रुग्णांना रुग्णालयातील औषधी दुकानातून औषधी खरेदी करण्याची सक्ती केली जाते अशा तक्रारी वारंवार प्रशासनास प्राप्त होत आहेत.

अशा प्रकारे रुग्णांलयाने त्यांचे संलग्न दुकानातूनच औषधे खरेदी करण्याची रुग्णांना सक्ती करणे ही बाब नियमबाहय आहे. तरी याअनुषंगे “रुग्णालयातील औषधी दुकानातूनच रुग्णांनी औषधांची खरेदी करावी अशी सक्ती नाही, रुग्णालयातील रुग्ण व त्यांचे नातेवाईक कोणत्याही परवानाधारक औषध विक्रेत्याकडून औषधांची खरेदी करु शकतात” अशा आशयाचा फलक ठळकपणे संबंधित रुग्णालयांनी रुग्णांना दिसतील अशा दर्शनीय भागात प्रदर्शित करावा, अशा सूचना देखील करण्यात आल्या आहे.