पुणे विद्यापीठातर्फे विद्यापीठाला तीन वर्षांसाठी सेट परीक्षेसाठी मान्यता
सहायक प्राध्यापक पदासाठी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) घेण्यास विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला तीन वर्षांसाठी मान्यता दिली आहे. त्यामुळे आता सेट परीक्षेच्या कालावधीत कोणताही खंड पडणार नाही.

मार्चमध्ये होणाऱ्या सेट परीक्षेसाठी आतापर्यंत १ लाख १० हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे महाराष्ट्र आणि गोवा राज्यासाठी सेट परीक्षेचे आयोजन करण्यात येते. विद्यापीठाच्या नियोजनानुसार सेट परीक्षा २६ मार्चला होणार आहे. यंदा परीक्षेसाठी परभणी आणि रत्नागिरी ही दोन केंद्रे वाढवण्यात आली आहेत. त्यामुळे परीक्षेची एकूण केंद्रे सतरा झाली आहेत.