राष्ट्रीय वयोश्री योजनेतंर्गत जेष्ठ नागरिकांना मिळणार ही उपकरणे….
राष्ट्रीय वयोश्री योजनेचे फायदे
■ या योजनेचा लाभ दारिद्रय रेषेखालील (BPL) ज्येष्ठ
लोकांपर्यंत पोहोचविला जाईल.
■ या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक लाभार्थी यांना
अर्ज करावा लागेल.
■ राष्ट्रीय वयोश्री योजना 2021 अंतर्गत लाभार्थी
कुटुंबाला उपकरणे विनाशुल्क दिली जातील.
■ देशातील प्रत्येक लाभार्थी कुटुंबाची साधन संख्या
कुटुंबातील लाभार्थी सदस्यांच्या संख्येवर अवलंबून
असेल.
■ प्रत्येक लाभार्थ्यास डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतरच
उपकरणे पुरविली जातील.
राष्ट्रीय वयोश्री योजनेंतर्गत देण्यात येणारी उपकरणे
■ चालण्याची काठी (Walking sticks)
■ कोपर क्रचेस (Elbow crutches)
■ ट्रायपॉड (Tripods)
■ क्वाडपॉड (Quadpods)
■ श्रवणयंत्र (Hearing Aids )
■ व्हील चेअर (Wheelchair)
कृत्रिम दात (Artificial Dentures)
■ चष्मा ( Spectacles)
पात्रता
■ अर्जदार हा भारतीय रहिवासी असणे आवश्यक आहे.
■ या योजनेंतर्गत त्या वृद्धांना पात्र मानले जाईल ज्यांचे
वय 60 वर्षांपेक्षा जास्त असेल.
■ बीपीएल/एपीएल प्रवर्गातून येणाऱ्या आर्थिकदृष्ट्या
दुर्बल कुटुंबांना या योजनेचा लाभ देण्यात येईल.
आवश्यक कागदपत्रे
■ आधार कार्ड
■ रेशन कार्ड
■ सेवानिवृत्ती निवृत्तीवेतन बाबतीत संबंधित कागदपत्रे.
■ शारीरिक असमर्थतेच्या बाबतीत प्रमाणपत्र किंवा
वैद्यकीय अहवाल.
■ पासपोर्ट आकाराचा फोटो.
राष्ट्रीय वयोश्री योजनेसाठी अर्ज कसा करावा
ज्येष्ठ नागरिकांनी आपले सरकार केंद्र (CSC) येथे राष्ट्रीय वयोश्री योजनेत नावनोंदणी अर्ज करण्यासाठी खालील लिंकचा वापर करावा.
https://alimco.csc-services.in/index.php