महसूल सहायक (लिपिक) भरती; MPSC मार्फत भरण्यासाठी मागणीपत्र पाठविण्याबाबत परिपत्रक जाहीर
राज्य शासकीय कार्यालयातील गट-क मधील लिपिकवर्गीय संवर्गातील सर्व पदे यापूढे महाराष्ट्र
लोकसेवा आयोगामार्फत भरण्याबाबत निर्णय घेण्यात आलेला असल्याने संदर्भाधीन क्र. ३ ते ५ येथील शासन निर्णयातील तरतूदी व सूचना विचारांत घेवून विहित नमुन्यातील सविस्तर मागणीपत्र शासनास सादर करण्याबाबत आपणांस संदर्भाधीन क्र. २ येथील शासन पत्रान्वये यापूर्वी कळविण्यात आले आहे.

दि.१.१.२०२३ ते दि.३१.१२.२०२३ या कालावधीत नियोजित स्पर्धा परीक्षांचा अंदाजित कार्यक्रम महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून निश्चित करण्यात आला असून, स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाने उपलब्ध करुन दिले आहे (प्रत सोबत).
त्यानुसार लिपिक-टंकलेखक संवर्गातील पदे “महाराष्ट्र
राजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३” मधून भरावयाचे प्रस्तावित असून, त्याकरीता
जाहिरात जानेवारी, २०२३ च्या पहिल्या आठवड्यात प्रसिध्द होणार असल्याने त्यासंबंधातील पदांचे मागणीपत्र पाठवितांना सद्या रिक्त असलेली पदे व नजिकच्या काळात पदोन्नती / सेवानिवृत्ती इत्यादी बाबींमूळे रिक्त होणारी पदे विचारांत घेण्याचे आयोगाने कळविले आहे.