केंद्र प्रमुख पदभरती- ५० टक्के पदे पदोन्नतीने व ५० टक्के पदे मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे भरण्यात येणार
केंद्र प्रमुख पदभरती संदर्भात यापूर्वी पारीत करण्यात
आलेला शासन निर्णय दिनांक १६.०२.२०१८ अधिक्रमित
करण्यात येत आहे व याबाबतीत तद्नुषंगिक शासन
निर्णय/ शासन शुध्दीपत्रक अधिक्रमित करण्यात येत
आहेत.

केंद्र प्रमुखाची सद्यस्थितीत रिक्त असलेली पदे तसेच
सेवानिवृत्ती, राजीनामा, बडतर्फी इत्यादी कारणांनी
यापुढे रिक्त होणाच्या पदावर, ती पदे जसजशी रिक्त
होतील, तसतशी ५० टक्के पदे पदोन्नतीने व ५० टक्के
पदे मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे त्या त्या
कोट्याच्या मर्यादेत भरण्यास मान्यता देण्यात येत आहे.
सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांनी
त्यांच्या जिल्हयातील उर्दू शाळांची संख्या विचारात
घेऊन केंद्रप्रमुखाची पदे निश्चित करावीत.
केंद्रप्रमुखांची रिक्त पदे विभागीय मर्यादीत स्पर्धा परीक्षा
तसेच पदोन्नतीने भरण्याबाबत खालीलप्रमाणे कार्यवाही
करण्यात यावी. विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येईल.
परीक्षेचे आयोजन व स्वरुप:- विभागीय मर्यादित स्पर्धा
परीक्षाद्वारे केंद्रप्रमुखाच्या निवडीसाठी अभियोग्यता व
बुध्दीमत्ता चाचणी परीक्षेचे आयोजन शासन निश्चित
करेल, अशा परीक्षा यंत्रणेमार्फत आयोजित करण्यात
येईल. सदर परीक्षा यंत्रणेकडून राज्यातील सर्व
जिल्ह्यामधील परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात येतील.