महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत नवीन पदभरतीचा GR जारी…
या शासन निर्णयान्वये भारतीय पशु चिकित्सा परिषद व भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांच्या मानकानुसार महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत मुख्यालय, अधिनस्त पशुवैद्यकीय, मत्स्य विज्ञान, दुग्ध तंत्रज्ञान महाविद्यालये, पशु पैदास प्रक्षेत्रे आणि वन्यजीव संशोधन व प्रशिक्षण केंद्र, गोरेवाडा येथील आस्थापनेकरीता सोबत जोडलेल्या परिशिष्ट ‘अ’ मध्ये दर्शविल्याप्रमाणे एकूण १८१६ पदे, परिशिष्ट ‘ब’ मध्ये दर्शविल्याप्रमाणे पुर्नज्जिवीत केलेली ५७ पदे (शिक्षक व शिक्षकेत्तर) अशी एकूण १८७३ नियमित पदे आणि परिशिष्ट ‘क’ मध्ये दर्शविल्याप्रमाणे बाहययंत्रणेद्वारे भरावयाची ४९ पदे याप्रमाणे सुधारित आकृतीबंधास शासन मान्यता देत आहे.

या शासन निर्णयान्वये महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर करीता सुधारित आकृतीबंधाच्या मान्यतेनुसार सर्व एकत्रित पदांचा गोषवारा सोबत जोडलेल्या परिशिष्ट ‘अ’ आणि पुनरुजिवित करण्यात आलेल्या पदांचा तपशील परिशिष्ट ‘ब’ मध्ये नमुद करण्यात आला आहे. याशिवाय बाहययंत्रणेद्वारे भरावयाच्या ४९ पदांचा तपशिल परिशिष्ट ‘क’ मध्ये दर्शविण्यात आलेला आहे.
तसेच विद्यापीठ अंतर्गत मुख्यालय, विविध घटक महाविद्यालये, पशुपैदास प्रक्षेत्रे, वन्यजीव संशोधन व प्रशिक्षण केंद्र, गोरेवाडा येथील आस्थापनेवरील मंजूर पदांचा तपशील परिशिष्ट ‘ड’-१ ते‘ड’-१६ येथे दर्शविण्यात आलेला आहे. परिशिष्ट ‘अ’ व ‘ब’ आणि परिशिष्ट ‘ड’ १ ते ‘ड’ १६ मध्ये दर्शविलेल्या संवर्गातील रिक्त पदे विद्यापीठ अधिनियम १९९८ व परिनियम २००२ अन्वये प्राप्त अधिकारानुसार महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर यांचेद्वारे भरण्यास परवानगी देण्यात येत आहे.
तसेच बाहययंत्रणेद्वारे सेवा घेतांना वित्त विभागाद्वारे वेळोवेळी निर्गमित केलेल्या सुचनांचा अवलंब करुन परिशिष्ट ‘क’ मधील विद्यापीठास बाह्ययंत्रणेद्वारे मंजूर पदांवर मनुष्यबळ उपलब्ध करुन घेण्यास परवानगी देण्यात येत आहे. परिशिष्ट ‘अ’ आणि परिशिष्ट ‘ड’-१ ते ‘ड’-१६ येथील नियमित पदांपैकी काही पदे मृत संवर्ग म्हणून दर्शविण्यात आली आहेत.
सदर परिशिष्टामध्ये जे संवर्ग मृत ठरविण्यात आले आहेत, त्या संवर्गात जितके कर्मचारी कार्यरत असतील तितकी पदे अधिसंख्य गणण्यात यावीत. सदर अधिसंख्य पदे त्यावर कार्यरत व्यक्तीच्या सेवानिवृत्ती / राजीनामा/ मृत्यु इ. कारणामुळे रिक्त झाल्यानंतर ते पद आपोआप रद्द होईल.
अधिसंख्य ठरलेल्या कर्मचाऱ्यांच्या वेतन व भत्याचा खर्च यापूर्वी ज्या लेखाशिर्षाखाली वेतन घेत होते, त्याच लेखाशिर्षाखाली यापुढेही खर्ची टाकण्यात यावा. उच्चस्तरीय सचिव समितीने मान्यता दिलेल्या सुधारीत आकृतीबंधातील पदांच्या पदभरतीबाबत वित्त विभागाच्या सदंर्भाधीन क्र. १५ येथील दिनांक ३०/०९/२०२२ आणि सदंर्भाधीन क्र. १६ येथील दिनांक ३१/१०/२०२२ रोजीच्या शासन निर्णयामध्ये निर्देशीत केलेले आहे. त्यानुसार महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ स्तरावरुन कार्यवाही करण्यात यावी.
सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या सहमतीने व त्या विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र. ३१८ / आपुक, दिनांक १४/०६/२०२२ आणि सामान्य प्रशासन विभाग अनौपचारिक संदर्भ क्र. १२१४/का १२, दिनांक २२/११/२०२२ अन्वये निर्गमित करण्यात येत आहे. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर
उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक क्रमांक २०२२१२०११६२३२८०९०१ असा
आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.