महाराष्ट्र तलाठी भरती 2022-23 अभ्यासक्रम….
परिक्षेचे स्वरुप

१) लेखी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाच्या असतील. प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक
प्रश्नास अधिकाधिक ०२ गुण ठेवण्यात येतील.
२)तलाठी पदासाठी अर्ज सादर केलेल्या उमेदवारांसाठी शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्र.प्रनि.म.१२१६/प्रक्र६५/१६/१३-अ, दि. १३/०६/२०१८ मधील तरतुदीनुसार तलाठी पदासाठी पदवी ही कमीत कमी अर्हता असल्याने सदर पदासाठी परीक्षेचा दर्जा भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या पदवी परीक्षेच्या दर्जाच्या समान राहील. परंतु मराठी या विषयाच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा उच्च माध्यमिक शांलात परीक्षेच्या (इयत्ता १२ वी ) च्या दर्जाच्या समान राहील व लेखी परिक्षेला मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौध्दीक चाचणी या विषयावरील प्रश्नाकरीता प्रत्येकी ५० गुण ठेवून एकुण २०० गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल.
३) शासन निर्णय, महसूल वन विभाग क्र. प्रानिमं-२००९/प्र.क्र.३५६/ई-१०, दि.०१/०१/२०१० मधील तरतुदीनुसार व शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्र.प्रनिम-१२१६/प्र.क्र.६५/१६/१३-अ दि.१३/०६/२०१८ मधील तरतुदीनुसार या पदांकरीता मौखिक परीक्षा (मुलाखती) घेण्यात येणार नाहीत.
४) उमेदवारांची निवडसूची तयार करणेसाठी शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग क्र. एसआरव्ही-
१०९७/प्र.क्र.३१/९८/१६अ. दि.१६/३/१९९९ आणि शासन शुध्दीपत्रक सामान्य प्रशासन विभाग
क्र.संकीर्ण१११८/प्रक्र.३९/१६-अ. दि.१९/१२/२०१८ अन्वये कार्यवाही करण्यात येईल.
५) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्र. प्रनिम-१२१६/प्रक्र६५/१६/१३-अ दि.१३/०६/२०१८ मधील तरतुदीनूसार गुणवत्ता यादीमध्ये अंतर्भाव करण्यासाठी उमेदवारांनी एकुण गुणांच्या किमान ४५% गुण प्राप्त करणे आवश्यक राहील.