‘या’ कंपन्या करणार मेगाभरती…
गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या टेक कंपन्या जगभरातील हजारो कर्मचार्यांना काढून टाकत आहेत. त्यावर महागाईचे देखील संकट आहे. याचा परिणाम जगभरातील सर्वच देशांवर होताना दिसतोय. मंदी येण्याची शक्यता व्यक्त केली जात असताना काही दिग्गज कंपन्या मंदी सारख्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी कर्मचारी कपात करत आहेत.
सॅमसंगने कंपनीने मात्र नोकर कपातीचा निर्णय न घेता नोकर भरतीचा निर्णय घेतला आहे. कंपनीने सांगितले की, भारतातील त्यांच्या R&D संस्थांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानावर काम करण्यासाठी IIT आणि उच्च अभियांत्रिकी संस्थांमधून सुमारे 1,000 इंजिनीअर्सना कामावर घेणार आहेत.
नवीन कर्मचारी पुढील वर्षी सॅमसंग R&D इन्स्टिट्यूट-बंगळुरू (SRI-B), Samsung R&D Institute-Noida, Samsung R&D Institute-Delhi आणि Samsung Semiconductor India Research मध्ये सामील होतील.
नवीन इंजिनीअर्स बेंगळुरू, नोएडा, दिल्ली आणि सॅमसंग सेमीकंडक्टर इंडिया रिसर्च येथील त्यांच्या R&D संस्थांमध्ये नवीन तंत्रज्ञानावर काम करतील.
नवीन कर्मचारी आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशिन लर्निंग, इमेज प्रोसेसिंग, इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT), कनेक्टिव्हिटी, क्लाउड, बिग डेटा, बिझनेस इंटेलिजन्स, प्रेडिक्टिव अॅनालिसिस, सिस्टम-ऑन-ए-चिप (SoC) या नव्या युगातील तंत्रज्ञानावर काम करतील.
सॅमसंग संगणक विज्ञान आणि संबंधित शाखा, माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स, इन्स्ट्रुमेंटेशन, एम्बेडेड सिस्टम आणि कम्युनिकेशन नेटवर्क यासारख्या विविध क्षेत्रातील अभियंत्यांची भरती करेल.
सॅमसंग IIT मधून सुमारे 200 अभियंते नियुक्त करेल. त्यांनी आयआयटी आणि इतर उच्च संस्थांमधील विद्यार्थ्यांना 400 हून अधिक प्री-प्लेसमेंट ऑफर देखील दिल्या आहेत.