गरीब विद्यार्थ्यांसाठी LIC कडून गोल्डन ज्युबिली स्कॉलरशिप स्किम 2022
शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये किमान 60% किंवा तत्सम श्रेणीद्वारे इयत्ता X / XII / डिप्लोमा अथवा तत्सम अभ्यासक्रम उत्तीर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑल इंडिया बेसिसवर शिष्यवृत्त्या घोषित करताना एलआयसी गोल्डन ज्युबिली स्कॉलरशिप स्किम 2022 देण्यात येत आहे. एलआयसीच्या प्रत्येक

डिव्हिजनल सेंटरमध्ये 20 रेग्युलर स्कॉलरशिप्स: पुढील विषयावरील उच्च शिक्षण घेण्यासाठी (मुलांसाठी व मुलींसाठी प्रत्येकी 10 )
(i) मेडिसिन, इंजिनियरिंग, कोणत्याही शाखेची पदवी, कोणत्याही क्षेत्रातील डिप्लोमा कोर्सेस आणि इंडिग्रेटेड कोर्सेस
(ii) सरकारी मान्यता असणान्या महाविद्यालय / संस्थांमधून व्यावसायिक शिक्षण अभ्यासक्रम किंवा औद्योगिक शिक्षण संस्थामधील (आयटीआय) अभ्यासक्रम
एलआयसीच्या प्रत्येक डिव्हिजनल सेंटरमध्ये मुलींसाठी 10 स्पेशल स्कॉलरशिप्स: 10 + 2 पद्धती अंतर्गत इयत्ता 11 व 12 चा अभ्यास करण्यासाठी
ऑनलाइन अर्ज पात्रतेच्या इतर शर्ती आणि स्किम्सच्या डिटेल्ससाठी www.licindia.in या वेबसाईट ला भेट द्या.
ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 18 डिसेंबर 2022 आहे.