75% अनुदानावर शेळी मेंढी वाटप योजनेसाठी अर्ज सुरु
योजनेचे ठळक वैशिष्ट्य
1. राज्यात मेंढी पालन व्ययसायास प्रोत्साहन देण्यासाठी.
2. योजना मुंबई व मुंबई उपनगर हे जिल्हे वगळता उर्वरित ३४ जिल्ह्यासाठी.
योजने अंतर्गत देण्यात येणारे लाभ
■ स्थायी आणि स्थ्यलांतरित पद्धतीने मेंढीपालनासाठी
पायाभूत सोई-सुविधेसाठी २० मेंढ्या +१ मेंढ्यानर अशा
मेंढीगटाचे ७५% अनुदानावर वाटप. सुधारित प्रजातीच्या मेंढ्याचे ७५% अनुदानावर वाटप करणे.
■ मेंढी पालनासाठी पायाभूत सोई-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ७५% अनुदान.
■ मेंढी पालनसाठी संतुलित खास उपलब्ध करून देण्यासाठी ७५% अनुदान.
■हिरव्या चाऱ्याला मुरघास करण्याकरिता गासड्या
बांधण्याचे यंत्र खरेदी करण्यासाठी ५०% अनुदान.
■ पशुखाद्य कारखाने उभारण्यासाठी ५०% अनुदान.
पात्रता:-
■ सदर योजना केवळ भटक्या जमाती (भज-क) या
प्रवर्गातील लाभार्थ्यांना लागू असेल.
■ लाभधारकाचे वय १८ वर्षापेक्षा कमी व ६० वर्षापेक्षा
जास्त नसावे. लाभधारकांची निवड करताना महिलांकरिता ३०% व अपंगांकरिता ३% आरक्षण.
■ या योजने अंतर्गत भटक्या जमाती (भज-क) प्रवर्गातील बचत गटांना / पशुपालक उत्पादक कंपन्याना लाभार्थी म्हणून प्राधान्य देण्यात येईल.
■ ज्या लाभधारकांना या आधी महामेष योजनेअंतर्गत
लाभ मिळालेला आहे अशा लाभधारकांना यामध्ये पुन्हा
अर्ज करता येणार नाही. पशुसंवर्धन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनेअंतर्गत गेल्या ३ वर्षामध्ये लाभ घेतलेल्या व्यक्ती किंवा कुटुंबातील व्यक्तीस या योजनेअंतर्गत पुन्हा अर्ज करता येणार नाही.
■ एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस अर्ज करता येईल.
■ स्थायी पद्धतीने मेंढी पालन करणाऱ्या लाभार्थ्यांना शेढ बांधण्याकरिता स्वतःची जागा असणे आवश्यक आहे.
■ अर्जदार किंवा अर्जदाराच्या कुटुंबातील सदस्य
शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य
संस्थेच्या सेवेत किंवा सेवानिवृत्ती वेतनधारक /
शासकीय पदाचा लाभ घेणारा, तसेच राज्य केंद्र शासन
/ स्थानिक स्वराज्य संस्थेचे सदस्य / पदाधिकारी/
लोकप्रतीनिधी नसावा.
अर्ज सादर करण्याची कार्यपद्धती
■ अर्ज सादर करण्याचा कालावधी १५/११/२०२२ ते
३०/११/२०२२ पर्यंत.
■ योजनेची पूर्ण माहिती या अर्ज सादर करण्याची
कार्यपद्धती पायाभूत संपूर्ण तपशील
www.mahamesh.co.in या संकेतस्थळावर
उपलब्ध आहे.
■ ऑनलाईन पद्धतीने अर्ज महामंडळाच्या वरील
संकेतस्थळावर तसेच Android Mobile मधील
Google Play store Mahamesh App
व्दारे करण्यात यावे.
हेल्पलाइनः- फोन नंबर: 020-25657112
ईमेल- mdsagpune@gmail.com