वैद्यकीय शिक्षण आणि औषध विभागात लवकरच मेगाभरती; GR जाहीर….
सध्या सुरु असलेल्या विविध भरतीच्या अपडेट्स मध्ये वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाची भर पडली असून लवकरच महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाची भरती प्रक्रिया सुरु होणार आहे.
या संदर्भातील शासन निर्णय सुद्धा प्रकाशित झाला असून या मध्ये उल्लेख केल्यानुसार हि भरती TCS-ION द्वारे घेण्यात येणार आहे. तसेच हि पदे लवकरात लवकर भरण्यात यावी असा सुद्धा उल्लेख या परिपत्रकात दिसून येतो. हा GR 21 नोव्हेंबर 2022 रोजी प्रकाशित झाल्याचे दिसून येत आहे.

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अधिनस्थ असलेल्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय, आयुष संचालनालय व अन्न व औषध प्रशासन, मानसिक आरोग्य केंद्र, पुणे अंतर्गत असलेली गट-ब (अराजपत्रित), गट-क तांत्रिक / अतांत्रिक व परिचर्या संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोटयातील पदे भरण्याबाबतची प्रक्रिया टि.सी. एस. आयओएन (T.C.S-ION) या कंपनीमार्फत करण्यास शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे.
सामान्य प्रशासन विभागाच्या दि. २१.११.२०२२ रोजीच्या शासन निर्णयान्वये दिलेल्या मार्गदर्शक सुचनांनुसार पुढील आवश्यक ती सर्व कार्यवाही करण्यास तसेच टी. सी. एस- आयओएन (T.C.S-ION) कंपनीसोबत करार करण्यास आयुक्त (वै.शि.) यांना प्राधिकृत करण्यात येत आहे. तसेच, टी. सी. एस (T.C.S-ION) कंपनीसोबत करार करण्याकरीता आयुक्त (वै.शि.) यांच्या कार्यालयाचे Legal Name :- DIRECTORATE MEDICAL EDUCATION vasa/ नात्रिक अतात्रिक पदे भरणेबाबत २०२० & या MUMBAI Registration नावाचे G.S.T. Number RESEARCH 27MUMD13141CIDI व Tan Number MUMD13141 या प्रमाणपत्राचा वापर करण्यात यावा.

सदर भरतीप्रक्रियेसंदर्भात काही बाबींस शासनाची मान्यता घेणे आवश्यक असल्यास त्याबाबतचा प्रस्ताव आयुक्त (वै.शि.) यांनी वेळोवेळी शासनास सादर करावा. सामान्य प्रशासन विभागाने दिलेल्या सुचनांनुसार तसेच, प्रचलित नियमांनुसार भरतीप्रक्रियेच्या अनुषंगाने सर्व प्रक्रिया आयुक्त, (वैद्यकीय शिक्षण व संशोधन) यांनी राबवावी.