Take a fresh look at your lifestyle.

पोस्टाच्या ‘या’ योजनेत मिळणार 2 लाखांचा निधी; फक्त 100 रुपयांची गुंतवणूक करून

0

पोस्ट ऑफिस नेहमीच आपल्या ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी एका पेक्षा एक नवीन योजना सादर करत असते. तुम्ही देखील तुमचा भविष्य सुरक्षित करण्यासाठी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर पोस्ट ऑफिस तुमचा साठी एक चांगला पर्याय ठरू शकतो.

आज आपण येथे पोस्ट ऑफिसमध्ये उपलब्ध असणाऱ्या एका अशाच भन्नाट योजनेबद्दल माहिती देणार आहोत जिथे तुम्ही फक्त 100 रुपयांची गुंतवणूक करून तब्बल 2 लाख रुपयांचा निधी जमा करू शकतात. आम्ही येथे पोस्ट ऑफिस रिक्युरिंग डिपॉझिट(R.D.) खाते योजनाबद्दल बोलत आहोत.

तुम्हाला पोस्ट ऑफिस काही योजनांमध्ये गुंतवणूक करायची असेल, तर पोस्ट ऑफिस रिक्युरिंग डिपॉझिट योजना तुमच्यासाठी एक सर्वोत्तम पर्याय असू शकते. या योजनेत 5.8 टक्के वार्षिक व्याजदर तुम्हाला मिळत आहे. गुंतवणूकदार फक्त रु. 100 च्या गुंतवणुकीत पोस्ट ऑफिस मध्ये सहज खाते उघडू शकतात. त्यानंतर 10-10 च्या पटीत गुंतवणूक करावी लागेल. 

या योजनेत गुंतवणूक करण्याची कोणतीही मर्यादा नाही, गुंतवणूकदार त्यांच्या इच्छेनुसार या योजनेत कितीही पैसे जमा करू शकतात. गुंतवणूकदाराने दररोज 100 रुपये गुंतवले तर दरमहा सुमारे 3000 रुपये जमा होतात. त्यानुसार ही रक्कम संपूर्ण 5 वर्षात 2.10 लाख रुपयांपर्यंत जाते. व्याजाची एकूण रक्कम 29,089 रुपये आहे.

 

या योजनेत एकल(Individual अकाउंट) आणि संयुक्त(जॉईंट अकाउंट) दोन्ही खाती उघडता येतात. योजना परिपक्व होण्यासाठी कमीतकमी 5 वर्षे लागतात. एवढेच नाही तर या योजनेच्या आधारे गुंतवणूकदार कर्जही घेऊ शकतात. 12 हप्ते पूर्ण केल्यानंतर तुम्ही जमा केलेल्या रकमेच्या 50% पर्यंत कर्ज घेऊ शकता.