Take a fresh look at your lifestyle.

पोलिस भरती करणाऱ्या उमेदवारांना आता याची ‘चिंता’ नाही; जाणून घ्या सविस्तर माहिती

0

पोलिस भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची मुदत ३० नोव्हेंबरपर्यंत आहे. कागदपत्रांची पडताळणी होउन अर्जदारांना मैदानी चाचणीसाठी सात दिवसांच्या मुदतीत कॉल लेटर पाठविले जाणार आहे. १२ डिसेंबरपासून मैदानी चाचणी सुरु करण्याचे नियोजन गृह विभागाने केले आहे. मैदानी चाचणीच्या निकालानंतर लेखी परीक्षा जानेवारी २०२३ मध्ये होईल, असे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.

पोलिस भरतीची स्थिती
एकूण जागा- १७,१३०
अर्ज करण्याची मुदत – ३० नोव्हेंबर
मैदानी चाचणीची तारीख – १२ डिसेंबर
‘लेखी’चा संभाव्य महिना – जानेवारी २०२३

नॉन क्रिमेलिअरची चिंता नको:- पोलिस भरतीसाठी अर्ज करणाऱ्या मागासवर्गीय उमेदवारांना आर्थिक उन्नत गटात मोडत नसल्यासंदर्भातील नॉन क्रिमेलिअर सादर करावे लागणार आहे. त्यासाठी गृह विभागाने १ एप्रिल २०२१ ते २१ मार्च २०२२ या काळातील नॉन क्रिमेलिअरची मूळ प्रत असावी, अशी अट घातली. त्यामुळे उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आणि आता ती मुदत संपून गेली अन्‌ तेव्हाचे क्रिमेलिअर कसे मिळणार, असा प्रश्न उपस्थित झाला.

काही आमदारांनी उपमुख्यमंत्र्यांना निवेदने देखील दिली. पण, मागील उत्पन्नावर सद्यस्थितीत काढलेले नॉन क्रिमेलिअर भरतीसाठी चालणार असल्याचे गृह विभागातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केल्यामुळे उमेदवारांची चिंता दूर झाली आहे.