Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा 2022; पदसंख्येत वाढ महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांच्या मागणीनुसार

0

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा-२०२२ (जाहिरात क्रमांक ०५३ / २०२२) मधून भरावयाच्या एकूण ८०० पदांकरीता दिनांक २३ जून, २०२२ रोजी प्रसिद्ध जाहिरातीमध्ये शासनाकडून प्राप्त मागणीपत्राचा तपशील देण्यात आला होता.

जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर शासनाच्या वित्त विभागाकडून दिनांक ०८ सप्टेंबर, २०२२ रोजीच्या पत्रान्वये राज्य कर निरीक्षक, गट-ब संवर्गाकरीता अतिरिक्त १६ पदांचे मागणीपत्र प्राप्त झाले आहे. तसेच आयोगाच्या कार्यालयाच्या दिनांक १८ ऑगस्ट, २०२२ रोजीच्या पत्राद्वारे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयातील सहायक कक्ष अधिकारी संवर्गाकरीता ०७ पदांचे मागणीपत्र प्राप्त झाले आहे.

सदर अतिरिक्त पदांचे मागणीपत्र लक्षात घेता विषयांकित महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा-२०२२ मधून भरावयाच्या चार संवर्गाकरीता एकूण ८२३ पदांचा समावेश करण्यात येणार आहे.