आता 3 नव्हे तर 4 वर्षांच्या शिक्षणानंतर मिळणार पदवी, युजीसीचा मोठा निर्णय….
बहुतांश पदवी अभ्यासक्रम हे 3 वर्षांचे आहेत. मात्र, विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नव्या नियमानुसार हे सर्व अभ्यासक्रम आता 4 वर्षांचे असतील. बीए, बीएस्सी, बीकॉमसाठी विद्यार्थ्यांना आता 4 वर्षे अभ्यास करावा लागणार आहे.
सर्व उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये राबविल्या जाणार्या चार वर्षांच्या अंडर ग्रॅज्यूएट प्रोग्रामची रूपरेषा अंतिम केली आहे. 2023-24 पासून सर्व विद्यापीठांचे नवीन विद्यार्थी 4 वर्षांचा अंडर ग्रॅज्यूएट कोर्सेसला प्रवेश घेऊ शकतील.
युजीसीचा नवा नियम:- चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमाचे हे नियम देशातील सर्व विद्यापीठांना शेअर केले जातील. पुढील शैक्षणिक सत्रापासून सर्व 45 केंद्रीय विद्यापीठांमध्ये, तसेच राज्य व खासगी विद्यापीठांमध्ये लागू केले जाईल.
सर्व विद्यार्थ्यांसाठी चार वर्षांचा पदवीपूर्व अभ्यासक्रम खुला असला, तरी विद्यार्थ्यांना त्यात प्रवेश घ्यायचा नसेल, तर सामान्य तीन वर्षांच्या पदवीपूर्व अभ्यासक्रमाचाही पर्याय असेल.
2023-24 पासून सर्व नवीन विद्यार्थ्यांना चार वर्षांचा पदवीपूर्व अभ्यासक्रम निवडता येईल. तसेच, ज्यांनी यंदा तीन वर्षांच्या पदवीपूर्व अभ्यासक्रमास प्रवेश घेतलाय, त्यांना पुढील सत्रापासून चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमात सहभागी होता येईल.