Take a fresh look at your lifestyle.

पंडीत दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना

0

योजनेचे स्वरुप:- ही योजना केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) व राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकूल योजनेतील घरकुल पात्र परंतु घरकूल बांधकामासाठी जागा उपलब्ध नसलेल्या लाभधारकांना लागू राहील.

योजनेच्या अटी:- जिल्हाधिकारी वा शासनाकडून उपलब्ध झालेल्या शासकीय, संपादित जागा किंवा ग्रामपंचायत अंतर्गत गावठाण हद्दीत येणारी व गावठाण हद्दीबाहेरील निवासी प्रयोजनासाठी सक्षम नियोजन प्राधिकरणाने मंजुरी दिलेल्या जागा उपलब्ध करून देण्यात येतील.

निवडलेल्या जागेस लाभार्थ्यांची सहमत असावी. घरकूल बांधकामासाठी ५०० चौ. फुटापर्यंत जागा खरेदी करण्यास मान्यता असेल. जागेची किंमत प्रती लाभार्थी ५० हजार पेक्षा जास्त असल्यास त्यावरील रक्कम लाभार्थ्यांने भरणे बंधनकारक आहे. लाभार्थ्यांने जागेची निवड केल्यानंतर जागा हस्तांतरण योग्य व जागेची किंमत याची शहानिशा समिती करेल.

लाभार्थी जागा मालकाबरोबर विक्री करार करेल. जागेसाठी देय निधी लाभार्थ्यांच्या बँक/पोस्ट खात्यात जमा करण्यापूर्वी लाभार्थ्यांने प्रतिज्ञापत्र देणे आवश्यक आहे. त्यानंतरच देय निधी खात्यामध्ये जमा करण्यात येईल.जागेची नोंद लाभधारकाच्या पत्नीच्या नावे किंवा संयुक्त नावाने घेण्यात येईल.

योजनेअंतर्गत लाभ:- लाभार्थ्यास ५० हजार रुपयेच्या मर्यादेत म्हणजेच जागेची प्रत्यक्ष किंमत व रुपये ५० हजारयापेक्षा जे कमी असेल त्याप्रमाणे निधी उपलब्ध करून दिला जाईल. यामध्ये स्टॅम्प ड्यूटी व जागा हस्तांतरणासाठी नियमाप्रमाणे येणारा खर्च समाविष्ट असेल.

अधिक माहितीसाठी:- पंचायत समितीचे गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी किंवा ग्रामसेवक यांच्याशी संपर्क साधावा.