दहावी बारावीचे 17 नंबर फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ….
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण
मंडळामार्फत माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी
व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी परीक्षेसाठी
विद्यार्थ्यांना फॉर्म नंबर 17 भरुन खाजगी विद्यार्थी म्हणून
नाव नोंदणी ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करण्यासाठी
अतिविलंब शुल्काने शुक्रवार 25 नोव्हेंबर 2022 पर्यंत
मुदतवाढ देण्यात आली आहे.
फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये होणाऱ्या उच्च माध्यमिक
प्रमाणपत्र इयत्ता बारावी व माध्यमिक शालांत परीक्षा
प्रमाणपत्र इयत्ता दहावी परीक्षेस खाजगी रित्या प्रविष्ठ
होणाऱ्या विद्यार्थ्यांचे नाव नोंदणी अर्ज ऑनलाईन पध्दतीने विलंब व अतिविलंब शुल्काने स्विकारण्याचा कालावधी 1 सप्टेंबर ते 31 ऑक्टोंबर 2022 मुदतवाढीने निश्चित करण्यात आला होता. खाजगीरित्या इयत्ता 10 वी इयत्ता 12 वी साठी प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांचे नावनोंदणी अर्ज अतिविलंब शुल्काने ऑनलाईन पध्दतीने स्विकारणाच्या अंतिम मुदतवाढीच्या तारखा पुढीलप्रमाणे आहेत.
अतिविलंब शुल्कासह निर्धारित अंतिम मुदत याप्रमाणे
आहे. माध्यमिक शाळांनी/कनिष्ठ महाविद्यालयांनी अति
विलंब शुल्क रु. 20/- प्रती विद्यार्थी प्रतीदिन स्विकारुन
विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने नाव नोंदणी अर्ज भरावयाच्या तारखा शुक्रवार 25 नोव्हेंबर 2022 पर्यंत भरावयाचा आहेत. खाजगी विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावी ते इयत्ता बारावीसाठी नावनोंदणी अर्ज ऑनलाईन पध्दतीनेच भरावयाचे आहेत. त्यामुळे कोणाचाही ऑफलाईन अर्ज स्विकारला जाणार नाही याची नोंद घ्यावी. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील वेबसाईटचा वापर करावा. अर्ज भरण्यासाठीच्या सूचना संकेतस्थळावर मराठी / इंग्रजीमधून उपलब्ध आहेत. त्या वाचून अर्ज भरण्यास सुरुवात करावी.
संकेतस्थळ:
■ इयत्ता दहावीसाठी http://form17.mh-
ssc.ac.in
■ इयत्ता बारावीसाठी http://form17.mh-
hsc.ac.in
विद्यार्थ्यांने अर्ज भरण्याकरिता लागणारी कागदपत्रे
1. शाळा सोडल्याचा दाखला (मूळ प्रत) नसल्यास द्वितीय प्रत व प्रतिज्ञापत्र,
2. आधारकार्ड,
3. स्वत:चा पासपोर्ट आकारातील फोटो
ऑनलाईन अर्ज भरताना सदर कागदपत्रे स्कॅन करुन
अपलोड करावयाची आहेत. कागदपत्रे स्कॅन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्कॅनर / मोबाईलद्वारे कागदपत्रांचे फोटो काढून ते अपलोड करावेत. विद्यार्थ्यांचा मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी पुढील संपर्कासाठी अनिवार्य आहे.
संपूर्ण अर्ज भरुन झाल्यावर भरलेल्या अर्जाची प्रत विद्यार्थ्यांला त्याने अर्जात नमूद केलेल्या ई-मेल वर पाठविली जाणार आहे. तसेच या संपूर्ण भरलेल्या अर्जाची प्रिंटआऊट, शुल्क पावती व हमीपत्र यासह दोन प्रतीत काढून घ्यावी. विद्यार्थ्यांनी अर्ज, विहित शुल्काची पावती व मूळ कागदपत्रे नावनोदणी अर्जावर नमूद केलेल्या संपर्क शाळा/कनिष्ठ महाविद्यालयामध्ये लगेच दुसऱ्या दिवशी जमा करावयाची आहेत.