भूमी अभिलेख भरती परीक्षेची तारीख जाहीर
भूमी अभिलेख विभागाच्या वतीने राज्यात भरण्यात येणाऱ्या एक हजार भूकरमापक (सर्व्हेअर) पदाची परीक्षा नोव्हेंबर च्या 28, 29 & 30 रोजी आयोजित करण्यात आली आहे. परीक्षा “पुणे विभाग, कोकण (मुंबई) विभाग, औरंगाबाद विभाग, नाशिक व अमरावती विभाग आणि नागपूर विभाग” या केंद्रांवर होणार आहे.

परीक्षेचे विभागनिहाय वेळापत्रक व उमेदवारांचे परीक्षेचे प्रवेशपत्राबाबत विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर ( https://mahabhumi.gov.in ) लिंक उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
पात्र उमेदवाराने संबंधीत संकेतस्थळावर देण्यात आलेल्या सुचनांनुसार प्रवेशपत्र डाऊनलोड करुन घेण्याचे असून प्रवेशपत्रावर नमुद परीक्षा केंद्रावर उमेदवाराने दिलेल्या वेळेत उपस्थित राहून परीक्षा द्यावयाची आहे.

सामान्य प्रशासन विभागाकडील दिनांक ०४/०५/२०२२ रोजीच्या शासन निर्णयानुसार ऑनलाईन पद्धतीने परीक्षेचे आयोजन करण्यात येणार असल्यामुळे उमेदवाराचे परीक्षा केंद्र हे महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही जिल्हा, तालुका अथवा इतर ठिकाणी असू शकते. परीक्षा पद्धतीबाबतची सविस्तर माहिती पुस्तिका विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. तसेच परिक्षेचे प्रवेशपत्र डाऊनलोड करण्याकरीताची लिंक देखील दिनांक १४/११/२०२२ पासून विभागाच्या उपरोक्त संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येईल.