म्हाडा भरती 2021कागदपत्रे पडताळणी दुसरी यादी
म्हाडा सरळसेवा भरती २०२१ अंतर्गत दि.०६.०६.२०२२, दि.०७.०६.२०२२, दि.०९.०६.२०२२, दि.१०.०६.२०२२, दि.१४.०६.२०२२, दि.१५.०६.२०२२, दि.१६.०६.२०२२ व दि. १७.०६.२०२२ रोजी कागदपत्र सादर करण्याकरीता उमेदवारांना बोलविण्यात आले होते, परंतु पुरेसे पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्याने कागदपत्र सादर करण्याच्या दुस-या टप्प्यात दि. २२.११.२०२२ रोजी कनिष्ठ लिपीक-टंकलेखक, वरिष्ठ लिपीक, सहायक, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक व लघुटंकलेखक या संवर्गातील उमेदवारांना बोलाविण्यात येत आहे.

बोलाविण्यात येत असलेल्या कनिष्ठ लिपीक-टंकलेखक, वरिष्ठ लिपीक, सहायक, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक व लघुटंकलेखक या संवर्गातील उमेदवारांची सूची या सूचनेसोबत म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे.
उमेदवारांनी सोबत आणावयाच्या कागदपत्रांची सूची म्हाडाच्या संकेतस्थळावर Recruitment 2021 Candidates List for Document Verification – MHADA Recruitment 2021 List of Documents मध्ये प्रसिध्द करण्यात आली आहे.
कागदपत्र सादर करण्याकरीता बोलाविण्यात आलेल्या उमेदवारांनी दि. २२.११.२०२२ रोजी सकाळी ०९.०० वाजता गुलझारीलाल नंदा सभागृह, ३ रा मजला, गृहनिर्माण भवन, वांद्रे (पूर्व), मुंबई ४०००५१ येथे सर्व मूळ कागदपत्र व स्वसाक्षांकीत प्रतीचा एक संच यासह उपस्थित रहावयाचे आहे.
जे उमेदवार कागदपत्र सादर करण्याकरीता उपस्थित राहणार नाहीत त्यांना पदभरती मध्ये स्वारस्य नाही असे समजण्यात येईल व त्यांचे नावाचा विचार करण्यात येणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे.