Take a fresh look at your lifestyle.

नाशिक मनपातील 706 पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा; डिसेंबरमध्येच भरती

0

महापालिकेत शेकडो पदे रिक्त असले तरी आता किमान ७०६ पदे भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शासनाने महापालिकेच्या सेवा मान्यता दिल्यानंतर आता या दोन्ही अत्यावश्यक सेवेतील भरतीसाठी त्रयस्थ संस्था निश्चित केला जात आहे राज्य शासन त्यावर अधिकृतरीत्या मान्यता प्राप्त संस्थांची नावे जाहीर करणार आहेत. चालू महिन्याच्या अखेरीस यासंदर्भातील कार्यवाही पूर्ण होणार असून त्यामुळे वर्षाखेरीस म्हणजेच डिसेंबरमध्येच भरती होण्याची शक्यता असल्याचे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले.

नाशिक महापालिकेचा आकृतिबंध शासनाकडे मंजुरीसाठी पडून आहे. गेले अनेक वर्षे झाले तरी त्यावर निर्णय झालेला नाही. किमान अग्निशमन दल, वैद्यकीय विभाग आणि अभियांत्रिकी पदे भरायची असेल तरी त्यासाठी आस्थापना खर्च मर्यादित करण्याचीदेखील अट घालण्यात आली. कोरोना काळात तर महापालिकेचे अत्यंत हाल झाले. कंत्राटी पद्धतीने डॉक्टर, नर्स आणि वॉर्डबॉयदेखील भरावे लागले अग्निमशन दलात तर कंत्राटी पद्धतीने कर्मचारी भरावे लागले आहेत.

वास्तविक हे जीवावर बेतणारे असून तरीही कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात आली आहे. अभियांत्रिकी विभागाची तर अवस्था बिकट आहे. पाणी पुरवठा विभागाला तर अभियंता दुर्मीळ आहेत, अशी अवस्था आहे.