पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा; ‘या’ अटी बाबत महाराष्ट्र शासनाचे राजपत्र जारी
महाराष्ट्र पोलीस अधिनियम. क्रमांक पोलीस-११२२/प्र.क्र.२२ /पोल – ५ अ. – महाराष्ट्र पोलीस अधिनियम (१९५१ चा २२) याच्या कलम ५ (ब) द्वारे प्रदान
केलेल्या अधिकारांचा, आणि त्याबाबतीत त्यास समर्थ करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन, याद्वारे, महाराष्ट्र पोलीस शिपाई (सेवाप्रवेश) नियम, २०११ यात आणखी सुधारणा करण्यासाठी, पुढील नियम करण्यात आले आहे.

१. या नियमांस, महाराष्ट्र पोलीस शिपाई (सेवाप्रवेश) (तिसरी सुधारणा) नियम, २०२२, असे म्हणावे.
२. महाराष्ट्र पोलीस शिपाई (सेवाप्रवेश) नियम, २०११ याच्या नियम ३ मध्ये, पोट-नियम (१) मधील खंड (अ) मध्ये, पुढील परंतुक जादा दाखल करण्यात येईल. परंतु, कोविड- १९ सार्वत्रिक साथरोगामुळे, १ जानेवारी, २०२० ते ३१ डिसेंबर, २०२२ या कालावधीमध्ये ज्या उमेदवारांनी कमाल वयोमर्यादा ओलांडली आहे असे सर्व प्रवार्गांचे उमेदवार निवडीद्वारे उक्त पदांसाठी सन २०२० व २०२१ या कॅलेंडर वर्षांतील रिक्त पदे भरण्यासाठी घेण्यात यावयाच्या भरती प्रक्रियेसाठी, एक वेळची उपाययोजना म्हणून, पात्र असतील.
अ. ए. कुलकर्णी,
शासनाचे सहसचिव.