Take a fresh look at your lifestyle.

महावितरण विद्युत सहाय्यक भरती चा सुधारित निकाल जाहीर

0

मा. उच्च न्यायालय मुंबई यांनी दि. २९/०७/२०२२ रोजी दिलेल्या न्यायनिर्णयानुसार प्रसिध्द केलेल्या सुधारीत निवड यादीमध्ये नव्याने निवड झालेल्या उमेदवारांची तसेच प्रतिक्षा यादीतील उमेदवारांची परिमंडळनिहाय यादी सोबत जोडलेली आहे. सदर यादीतील उमेदवारांच्या ऑनलाईन अर्जामध्ये नमुद नोंदी/अर्हता संबधीतांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी दि. ०२/११/२०२२ ते दि. ०३/११/२०२२ रोजी करण्यात येणार आहे.

महावितरणमधील विद्युत सहायकांच्या भरतीसाठीचे एक पाऊल पुढे पडले आहे. याअंतर्गत येत्या शनिवार व रविवारी कागदपत्रांची पडताळणी होणार आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून रखडलेल्या भरतीचा मार्ग मोकळा होत आहे.

राज्याच्या ऊर्जा कंपन्यांत वर्ग ३ व ४मधील पदे अनेक वर्षांपासून रिक्त आहेत. त्यापैकी महावितरण कंपन्यांत सुमारे साडेआठ हजार पदे रिक्त आहेत. ती भरण्यासाठी दोन वर्षांपूर्वी तयारी सुरू झाली. उमेदवारांची निवड यादीदेखील तयार झाली. पण अद्याप या उमेदवारांची कागदपत्र पडताळणी झाली नव्हती. त्यामुळे नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्यांमध्ये नाराजीचा सूर होता. त्यानंतर अखेर या उमेदवारांच्या नियुक्तीची पुढची पायरी सुरू होत आहे.

महावितरणमध्ये विद्युत सहायक या संवर्गाची रिक्त पदे भरण्याकरिता तीन वर्षांच्या निश्चित कालावधीकरिता कंत्राटी पद्धतीने उमेदवारांची निवड करण्यासाठी एप्रिल व जुलै २०१९मध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर आता परिमंडलनिहाय यादीमधील उमेदवारांनी त्यांच्या नावासमोर नमूद केलेल्या परिमंडल कार्यालयांमध्ये २९ व ३० ऑक्टोबरला आपल्या कागदपत्रांची पडताळणी स्वत: उपस्थित राहून करणे अनिवार्य आहे, असे महावितरणने म्हटले आहे.

नव्याने निवड झालेल्या उमेवारांची तसेच प्रतीक्षायादीवरील उमेदवारांची परिमंडलनिहाय यादी महावितरणच्या संकेतस्थळावर (www.mahadiscom.in) उपलब्ध करून देण्यात आली आहे. कागदपत्रे पडताळणी साठी गैरहजर राहणाऱ्या उमेदवारांची उमेदवारी रद्द समजली जाईल, असेही महावितरणने म्हटले आहे.