MPSC च्या झटपट निकालासाठी ‘या’ पद्धतीचा वापर केला जाणार
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत डिसेंबर -20222 मध्ये महाराष्ट्र राज्य सेवा मुख्य परीक्षा होणार आहे. ‘एमपीएससी’कडून 161 पदांसाठी ही भरली केली जाणार होती. मात्र, आता त्यात 462 पदांची वाढ करण्यात आली असून, आता 623 पदे भरण्यात येणार आहेत.
पदसंख्येत मोठी वाढ:- राज्यसेवा परीक्षा-2022 साठी 11 मे रोजी जाहिरात प्रसिद्ध झाली. त्यानंतर या परीक्षेसाठी काही नवीन संवर्गातील 462 पदांचे अतिरिक्त मागणीपत्र शासनाकडून प्राप्त झाले होते. त्यानुसार आधीची 161 व अतिरिक्त 462, असे एकूण 623 पदांचा तपशील जाहीर केला आहे. उपजिल्हाधिकारी, पोलिस उपअधीक्षक, सहाय्यक पोलिस आयुक्त, सहाय्यक राज्यकर आयुक्त, गटविकास अधिकारी, शिक्षणाधिकारी, प्रकल्प अधिकारी, तहसीलदार अशी गट ‘अ’ आणि गट ‘ब’ संवर्गातील पदे भरली जाणार आहेत.
डिजिटल मूल्यांकन पद्धती:- दरम्यान, स्पर्धा परीक्षांचे निकाल अचूक व झटपट जाहीर करण्यासाठी लवकरच डिजिटल मूल्यांकन पद्धतीचा वापर केला जाणार असल्याची घोषणा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतली आहे.