Take a fresh look at your lifestyle.

केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेसाठी (CTET) नोंदणी सुरू

0

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (CBSE) १६ व्या केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेसाठी (CTET) नोंदणी सुरू केली जात आहे. सीटीईटी(CBSE CTET 2022) साठी नोंदणी करण्यास इच्छुक असलेले सर्व उमेदवार अधिकृत वेबसाइट ctet.nic.in वर जाऊन अर्ज करू शकतात. उमेदवारांना २४ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येईल तर २५ नोव्हेंबर २०२२ पर्यंत शुल्क भरता येणार आहे. यावर्षी सीटीईटी कॉम्प्युटर बेस्ड माध्यमातून डिसेंबर २०२२ आणि जानेवारी २०२३ दरम्यान होणार आहे.

अर्ज शुल्क:- सामान्य आणि ओबीसी श्रेणीतील उमेदवारांना पेपर १ किंवा पेपर २ साठी अर्ज केला तर त्यांना अर्ज फी म्हणून १ हजार रुपये भरावे लागतील. तर पेपर १ आणि २ (CBSE CTET 2022) दोन्हीसाठी अर्ज करणाऱ्यांना उमेदवाराला १,२०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल.

एससी, एसटी आणि पीडब्ल्यूडी उमेदवारांना पेपर १ किंवा पेपर २ साठी ५०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागतील. तर जर उमेदवाराने दोन्ही पेपरसाठी अर्ज केला तर त्याला ६०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागतील. परीक्षेशी संबंधित तपशीलवार माहिती लवकरच प्रसिद्ध केली जाईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.