Take a fresh look at your lifestyle.

नुकसानग्रस्त बाधित शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या मदतीच्या अटीमध्ये सुधारणा; जाणून घ्या सविस्तर माहिती

0

महसुल व वन विभाग
शासन निर्णय क्रमांक : सीएलएस-२०२२/प्र.क्र.३३८
/म-३
दिनांक : ३१ ऑक्टोबर, २०२२

शासन निर्णयः- नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेत जमीनीच्या नुकसानीकरिता महसूल व वन विभागाच्या दि.१३.५.२०१५ च्या शासन निर्णयान्वये देय असलेली मदत विहित अटी व शर्तीची पूर्तता करणाऱ्या २ हेक्टर
पेक्षा जास्त जमीन धारण करणाऱ्या शेतकऱ्यांना देखील २ हेक्टरच्या मर्यादेत अनुज्ञेय करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे.

२.चालू हंगामामध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतजमीनीच्या नुकसानीबाबत विहित कार्यपध्दतीचा
अवलंब करुन आवश्यक त्या निधी मागणीचे प्रस्ताव सर्व जिल्हाधिकारी यांनी विभागीय आयुक्त यांच्या मार्फत
शासनास सादर करावेत. ही मागणी सादर करतांना विहित इतर अटी व शर्ती यांची पूर्तता झाल्याची खात्री
करण्यात यावी. तसेच शेत जमीनीचे नुकसान झाल्याची खात्री करण्याकरिता ई-पीक पाहणीचा अथवा अन्य
उपलब्ध नोंदीचा आधार घेण्यात यावा.

३. वरील प्रयोजनासाठी होणारा खर्च प्रधान लेखाशीर्ष २२४५- नैसर्गिक आपत्तीच्या निवारणासाठी अर्थसहाय, ०२ पुर चक्रीवादळे इत्यादी अंतर्गत लेखाशिर्षाखाली राज्य शासनाच्या मंजूर व उपलब्ध निधीमधून भागविण्यात यावा.

सदर आदेश, वित्त विभागाच्या अनैपचारिक संदर्भ क्र.३४३/२०२२/व्यय-९, दि. २१ ऑक्टोबर, २०२२
अन्वये प्राप्त सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे.
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक क्रमांक २०२२१०३१११३१२०९३१९ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात आला आहे.