विद्यार्थ्यांनो, पोलीस भरतीच्या निकषामध्ये होणार मोठा बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती
कोरोनामुळे दोन वर्षांत पोलिसांसह अन्य शासकीय नोकरभरती राबविता आली नाही. त्यामुळे राज्यातील हजारो तरुणांची वयोमर्यादा संपुष्टात आल्याने त्यांना आता त्यात सहभागी होता येणार नाही. त्यासंबंधीची असंख्य निवेदने सरकारकडे आली आहेत.

या पार्श्वभूमीवर आता पोलिस भरतीसाठी वयोमर्यादा दोन ते तीन वर्षांनी वाढणार आहे. त्यासंबंधीचा निर्णय मंगळवारी (ता. १) मंत्रिमंडळाच्या बैठकीत होणार आहे. राज्यात पोलिसांची १४ हजार ९५६ जागांची एकाचवेळी भरती होणार आहे. अर्ज भरण्यास गुरुवारपासून (ता. ३) प्रारंभ होणार होता. पण, कोरोना काळात व त्यापूर्वी राज्यात शासकीय नोकरभरती झाली नाही. नोव्हेंबरअखेरीस ही प्रक्रिया सुरु होणार आहे.