Take a fresh look at your lifestyle.

आता घरबसल्या करा आपले ‘ड्रायव्हिंग लायसन्स’ रिन्यू…

0

ड्रायव्हिंग लायसन्स बनविल्यानंतर त्याचे वेळोवेळी नूतनीकरण करावे लागते. एक वेळ अशी होती की, ड्रायव्हिंग लायसन्सचे नूतनीकरण करण्यासाठी आरटीओ कार्यालयाच्या अनेक फेऱ्या माराव्या लागत होत्या.

मात्र, आता परिवहन मंत्रालयाने नियमात बदल करून ड्रायव्हिंग लायसन्स मिळण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी केली आहे. आता तुम्ही तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्सचे ऑनलाइन नूतनीकरण घरी बसून करू शकता. यासाठी तुम्हाला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. परिवहन मंत्रालयाच्या नवीन नियमांनुसार, तुम्ही आता RTO
कार्यालयात न जाता या https://parivahan.gov.in/parivahan लिंकवर क्लिक करून ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करू शकता.

नियमांनुसार, तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्सची वैधता संपल्यानंतर तुम्हांला ३० दिवस मिळतात. या दरम्यान तुम्हाला नूतनीकरणासाठी अर्ज करावा लागेल.
ड्रायव्हिंग लायसन्सच्या नूतनीकरणासाठी अशा प्रकारे अर्ज करा…

■ प्रथम https://parivahan.gov.in/parivahan वरून फॉर्म डाऊनलोड करा.

■ येथे तुम्हाला तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्सचे ऑनलाइन नूतनीकरण करण्याचा पर्याय आहे. ड्रायव्हिंग लायसन्सवर सेवांवर क्लिक करा.

■ पुढे तुम्हाला एक अर्ज भरावा लागेल. विनंती केलेली सर्व कागदपत्रे अपलोड करा.

■यानंतर, ड्रायव्हिंग लायसन्स तुमच्या पत्त्यावर पोहोचेल.