Take a fresh look at your lifestyle.

आधार कार्डला आता ‘ही’ गोष्ट लिंक करावी लागणार…!

0

UIDAI ने देशातील करोडो आधार कार्ड धारकांना आधार कार्ड अपडेट करण्याचे आवाहन केले आहे. आधार कार्ड बनवताना आधारचा गैरवापर टाळण्यासाठी किंवा त्यासंबंधी सर्व माहीती सायबर चोरांपासून संरक्षित ठेवण्यासाठी युआयडीएआय ने महत्वाची माहीती दिली आहे.

UIDAI ने देशातील सर्व आधार कार्डधारकांना त्यांच्या आधार कार्डला ई-मेल आयडी कनेक्ट करण्यास सांगितलं आहे. भारतात काही नागरिकांकडे 10 वर्ष किंवा त्या आधीपासूनचे आधार कार्ड असल्याने त्यावेळेस फक्त नाव, मोबाईल नंबर, पत्ता अशी काही माहीती दिली जात होती. परंतु तेव्हापासून देखील काहींनी बरीच माहीती अपडेट केलेली नाही, अशा नागरिकांना आपली माहीती अपडेट करावी लागणार आहे.

आधार कार्ड तयार करण्याच्या वेळेस आपण मोबाईल नंबर दिला असेल तो मोबाईल नंबर जर बंद झाला असेल तर नवीन मोबाईल नंबर आधारशी लिंक करण्यास यापूर्वी सांगितले होते. आता UIDAI ने आपल्याला आपला ई-मेल आयडी अपडेट करायला सांगितला आहे. जेणेकरून तुम्हाला काही सूचना किंवा कोणी सायबर चोर तुमच्या आधारचा गैरवापर करत असेल तर तुम्हाला ई-मेल वर अलर्ट करण्यात येणार आहे.

आधार कार्डधारकांना त्यांच्या आधारचा गैरवापर होत आहे की नाही, याची माहिती ई-मेलद्वारे मिळू शकते. E-mail ID आधार सेवा केंद्र मध्ये जाऊन अपडेट करा. तुमचा ई-मेल आयडी आधारशी लिंक करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या आधार केंद्राला भेट द्यावी लागेल.