BAMU मध्ये प्राध्यापकांच्या १८४ पदे भरण्यास मंजुरी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न ११७ अनुदानित महाविद्यालयांपैकी ४४ महाविद्यालयात १८४ पदे भरण्यासाठी मंजुरी मिळाली आहे. विद्यापीठ स्तरावर मागासवर्गीय कक्षकडून (मावक) रोस्टर प्रमाणित करून घेण्याच्या फिन्यात ही भरती प्रक्रिया अडकली आहे.

दि. १ ऑक्टोबर २०१७ रोजी रिक्त पदानुसार राज्यात सुमारे दोन हजार पदे भरण्यास शासनाकडून मान्यता मिळाली. त्यानुसार प्राध्यापकांच्या १८४ रिक्त पदांचा समावेश आहे. कोरोनाकाळात ही भरती रखडली होती. विविध संघटनांनी भरतीला गती मिळण्यासाठी आंदोलने केली. दरम्यान, २१ जुलै रोजी उच्च शिक्षण विभागाने प्राचार्य, सहसंचालक विद्यापीठाचे संबंधित अधिकारी यांच्या बैठकीत या प्रक्रियेचा आढावा घेतला.