Take a fresh look at your lifestyle.

दिवाळीच्या सुटीत मनसोक्त फिरा, पैशांची चिंता विसरा..! रेल्वेकडून प्रवाशांना खास भेट…

0

दिवाळीच्या सुटीत पर्यटनाचा विचार असेल, तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. इंडियन रेल्वे कॅटरिंग आणि टुरिझम काॅर्पोरेशन अर्थात ‘आयआरसीटीसी’कडून रेल्वे प्रवाशांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. ‘आयआरसीटीसी’च्या या नव्या खास सुविधेनुसार, प्रवाशांना यंदाच्या दिवाळीत एकही पैसा न देता तिकीट बूक करुन देशभर फिरता येणार आहे.

दिवाळीच्या सुटीत पर्यटनाचा जाण्याचा विचार असेल, मात्र पैशांची चणचण जाणवत असेल, तर टेन्शन घेण्याची गरज नाही. प्रवाशांची गरज लक्षात घेऊन, ‘आयआरसीटीसी’ने ‘ट्रॅव्हल नाऊ – पे लेटर’ ही सुविधा सुरु केली आहे. ‘आयआरसीटीसी’च्या ‘रेल कनेक्ट’ अ‍ॅपवरही ही सुविधा उपलब्ध असून, त्यासाठी ‘CASHe’ सोबत रेल्वेने भागीदारी केली आहे.
रेल्वेच्या या नव्या सुविधेमुळे खिशात पैसे नसले, तरी प्रवाशांना तिकीट बूक करता येईल. त्याची प्रक्रिया कशी असेल, हे सविस्तर जाणून घेऊ या.

असे करा तिकिट बूक:- सर्वप्रथम ‘गुगल प्ले-स्टोअर’वरुन तुम्हाला ‘आयआरसीटीसी’चे ‘रेल कनेक्ट’ हे अ‍ॅप डाउनलोड करावे लागेल.

▪️ या अ‍ॅपवर ‘ट्रॅव्हल नाऊ, पे लॅटर’ या पर्यायावर क्लिक करुन रेल्वेचे रिझर्व्ह तिकिट बुकींग करता येईल.

▪️ एकदा हा पर्याय निवडल्यावर आरक्षित अथवा तात्काळ तिकिट बुकींगचा पर्याय खुला होईल.

▪️ त्यानंतर प्रवाशाला चेकऑऊट पेजवर किती हप्त्यात ही रक्कम चुकती करायची आहे, त्याची निवड करावी लागेल.

▪️ ही संपूर्ण प्रक्रिया कोणत्याही कागदपत्राविना सहज सोप्या पद्धतीने करता येईल.

▪️ रेल्वे तिकिटांची रकमेची परतफेड प्रवाशांना सुलभ 3 ते 6 हप्त्यांमध्ये (ईएमआय) करता येईल.

याबाबत ‘CASHe’ चे चेअरमन व्ही. रमन कुमार यांनी माहिती दिली. ते म्हणाले, की ‘आयआरसीटीसी’च्या ‘रेल कनेक्ट’ अ‍ॅपच्या माध्यमातून ‘Travel Now – Pay Later’ ही सुविधा संपूर्ण देशात लागू करण्यात आली आहे. या अ‍ॅपद्वारे देशभरात जवळपास 15 लाख लोक तिकीट बूक करीत असल्याचे ते म्हणाले.