राज्यातील तलाठी संवर्गातील अस्थायी पदांना मुदतवाढ; शासन निर्णय जाहीर
संपूर्ण राज्यात विभागनिहाय, जिल्हानिहाय तलाठी संवर्गाच्या मंजूर असलेल्या एकूण १२६३६ पदांपैकी ८५७४ पदे स्थायी असून, उर्वरित ४०६२ पदे अस्थायी आहेत.

सदर पदांपैकी कोणतेही पद सहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधीसाठी रिक्त नसल्याचे सर्व विभागीय आयुक्त कार्यालयांनी प्रमाणित केलेले आहे. सबब, सोबतच्या प्रपत्र-अ मधील स्तंभ क्र.५ मध्ये नमूद केलेल्या तलाठी संवर्गाच्या एकूण ४०६२ अस्थायी पदाना दि.०१.०९.२०२२ ते दि.२८.०२.२०२३ पर्यंत या शासन निर्णयाव्दारे मुदतवाढ देण्यात येत आहे.