Take a fresh look at your lifestyle.

प्राचार्य व सहाय्यक प्राध्यापकांची रिक्त पदे भरण्याबाबत मान्यता; शासन निर्णय जाहीर

0

शासन निर्णय क्र आढावा१५१३/प्र.क्र.१२५(भाग-८)/म.शि.५ दि. १२.११.२०२१ अन्वये अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमधील प्राचार्य व सहाय्यक प्राध्यापक या संवर्गातील रिक्त पदे भरण्याबाबत मान्यता देण्यात आलेली आहे. याबाबत तातडीने कार्यवाही करण्याबाबत संचालनालयाच्या संदीय पत्रान्वये वेळोवेळी निर्देश देण्यात आलेले आहेत.

तरी याबाबत पुनश्च: कळविण्यात येते की, दिनांक ३१.१०.२०२२ पर्यंत आवश्यक सर्व कागदपत्रांसह पदभरती ना-हरकत प्रमाणपत्रासाठीचे प्रस्ताव विहीत पध्दतीने निश्चितपणे प्राप्त होतील यास्तव कार्यवाही करावी अन्यथा संबधित महाविद्यालय पदभरतीसाठी ना-हरकत प्रमाणपत्र मागणीकरीता इच्छूक नसल्याचे ग्राहय धरण्यात येऊन संबधित महाविद्यालयास पदभरतीसाठी अनुज्ञेय करण्यात आलेली पदे, पदभरतीसाठी मागणी केलेल्या अन्य महाविद्यालये/ संस्थांना वर्ग करण्याबाबत शासनास प्रस्तावित करण्यात येईल. ही बाब सर्व सबंधितांच्या निदर्शनास आणून देण्यात यावी.