Take a fresh look at your lifestyle.

वीज ग्राहकांचे अधिकार, हक्क आणि कशी मिळते नुकसान भरपाई; जाणून घ्या सविस्तर माहिती

0

आपल्या सर्व सामान्यच्या जीवनाचा अविभाज्य घटक म्हणजे आपल्या घरात येणारी वीज जीला आपण लाईट
म्हणतो. ही वीज आपण विविध वीज कंपनी कडून आपण विकत घेत असतो तेव्हा आपण या वीज कंपनीचे ग्राहक बनत असतो आणि आपण जेव्हा ग्राहक होतो तेव्हा आपल्याला कायद्याने काही अधिकार हक्क प्राप्त होत असतात.

वीज मीटर मध्ये बीघाड झाल्यास वीज ग्राहकांचे अधिकार:- विद्युत मीटर वेगाने फिरत असल्यास किंवा त्यात काही बिघाड आहे असे वाटल्यास सदर मिटर विद्युत वितरण कंपनीकडून योग्य ते चाचणी शुल्क भरून तपासून घेण्याचा ग्राहकांना अधिकार आहे. जर मिटर सदोष व खराब असल्याचे आढळले तर चाचणी शुल्क परत देणे तसेच मोफत नवीन मिटर बसवून देणे ही
विद्युत कंपनीची जबाबदारी आहे. ग्राहकांच्या मागणीनुसार विद्युत मिटरची चाचणी / तपासणी ही विद्युत नियामक आयोगाने ठरविलेल्या अन्य तज्ज्ञ आढळले तर चाचणी शुल्क परत देणे तसेच मोफत नवीन मिटर बसवून देणे ही विद्युत कंपनीची जबाबदारी आहे. ग्राहकांच्या मागणीनुसार विद्युत मिटरची चाचणी / तपासणी ही विद्युत नियामक आयोगाने ठरविलेल्या अन्य तज्ज्ञ यंत्रणांकडून ही करता येईल. याची माहिती विद्युत कंपनीकडून ग्राहकांना मिळाली पाहिजे. विद्युत मिटर जळाल्याची ग्राहकाने तक्रार विद्युत वितरण कंपनीकडे
केल्यानंतर शहरी भागात २४ तासाच्या आत व ग्रामीण भागात ४८ तासाच्या आत नवीन मिटर बसवून विद्युत पुरवठा पूर्ववत करणे ही कंपनीची जबाबदारी आहे.

वीज बिल जास्त आले तर काय करावे:- नियमित व ठराविक बील येणाऱ्या ग्राहकास एखाद्या महिन्यात अचानक मोठ्या रक्कमेचे बील येते. ग्राहक विद्युत कंपनीकडे तक्रार करायला गेल्यास अगोदर बील भरा नंतर तक्रार करा. नसता विद्युत पुरवठा खंडीत होईल असे सांगीतले जाते. विद्युत कंपनीकडून असा दिला जाणारा सल्ला हा दिशाभूल करणारा असतो. नियमित व ठराविक बील येणाऱ्या ग्राहकास जर अचानक मोठे व वाढीव बील असल्यास असे मोठे व वाढीव बील भरण्याची सक्ती करता येत नाही हा अधिकार आहे. अशा परिस्थितीत विद्युत अधिनियम २००३ च्या कलम ५६ उपकलम (१) नुसार ग्राहकाला परंतुकानुसार निषेध नोंदवून निषेध बील भरण्याची कायदेशीर तरतूद आहे. अचानक आलेले वाढीव व मोठे बील भरण्यापेक्षा मागील सहा महिन्यातील बीलांची सरासरी काढून त्या सरासरी इतके बील भरता येते. अचानक आलेले वाढीव व मोठे बील भरण्यापेक्षा मागील सहा महिन्यातील बीलांची सरासरी काढून त्या सरासरी इतके बील भरता येते.
याला निषेध बील किंवा पेमेंट विथ क्लेम असे म्हणतात. असे बील भरून घेतल्यानंतर विद्युत कंपनीस ग्राहकांचा विद्युत पूरवठा खंडीत करता येणार नाही.

जास्त वेळ लाइट गेल्यास भरपाई:- विद्युत कंपनीने कोणतीही पूर्वसूचना न देता शहरी भागात ४ तासापेक्षा अधिक काळ व ग्रामीण भागात २४ तासापेक्षा अधिक काळ विद्युत पूरवठा खंडीत ठेवला तर प्रभावीत ग्राहक विद्युत कंपनीकडे नुकसान भरपाई मागू शकतो हा वीज ग्राहकाचा अधिकार आहे.

विद्युत लोकपाल यांच्याकडे तक्रार कशी करावी:- सर्वप्रथम वीज ग्राहकांनी आपली लेखी तक्रार स्थानिक तालुका वा जिल्हा स्तरावरील विद्युत कार्यालयाकडे करावी. सदर कार्यालयाने १० ते १५ दिवसात तक्रारीचे निवारण वा समाधान केले नाही तर सदर तक्रार विद्युत गान्हाणे / तक्रार पंचामध्ये तक्रार दाखल करावी हा
वीज ग्राहकाचा अधिकार आहे.