इंडिया पोस्टतर्फे तब्बल 1लाख जागांसाठी मेगाभरतीची घोषणा
भारतीय टपाल विभागात एक लाखाहून अधिक पदं रिक्त आहेत. म्हणूनच आता केंद्र सरकारने याबाबत अधिसूचना जारी केली आहे. सरकारने देशभरातील 23 मंडळांमध्ये रिक्त पदे मंजूर केली आहेत. त्यामुळे आता देशातील सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तब्बल एक लाख उमेदवारांना जॉब्स मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

ही पदे मेल मोटर सेवा विभाग, टपाल सेवा गट ब पदे, सहाय्यक अधीक्षक पदे, निरीक्षक आणि पोस्टल ऑपरेटिव्ह विभागामध्ये उपलब्ध आहेत. पोस्टमन, मेल गार्ड, स्टेनोग्राफर, मल्टी टास्किंग स्टॉप, सेव्हिंग बँक कंट्रोल ऑर्गनायझेशनशी संबंधित पदे आणि रेल्वे मेल सेवा अंतर्गत प्रादेशिक कार्यालये यासारख्या खालील संवर्गाच्या पदांसाठी किती पदे मंजूर केली जात आहेत याचा उल्लेख या अधिसूचनेत करण्यात आला आहे.
यासोबतच स्टेनोग्राफरची पदेही मंडळनिहाय मंजूर करण्यात आली आहेत. महाराष्ट्र मध्येही या सर्व पदांसाठी जागा रिक्त आहेत.