बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार रोजगाराभिमुख शिक्षण; नोंदणीस सुरूवात
राज्यातील बारावीच्या 15 हजार विद्यार्थ्यांना शिक्षण व रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. यासाठी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस सोबत नुकताच सामंजस्य करार करण्यात आला असून यासाठीच्या नोंदणीची सुरूवात येत्या 1 ऑक्टोबर 2022 पासून सुरू होणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.
शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, शालेय शिक्षण
सचिव रणजितसिंह देओल, समग्र शिक्षा राज्य प्रकल्प
संचालक कैलास पगारे तसेच टाटा इन्स्टिट्यूटच्या वतीने स्कूल ऑफ व्होकेशनल एज्युकेशनच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या करारानुसार या अभ्यासक्रमासाठी
https://admissions.tiss.edu या संकेतस्थळावर
नोंदणी करता येणार असून डिसेंबरच्या शेवटच्या
आठवड्यापर्यंत प्रवेशाची अंतिम तारीख असेल. तर,
जानेवारी 2023 च्या दुसऱ्या आठवड्यात प्रत्यक्ष
अभ्यासक्रमाची सुरूवात होणार आहे.
अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना नॅशनल स्कील क्वालिफिकेशन फ्रेमवर्क आधारित प्रमाणपत्र देण्यात येईल. यामध्ये पहिल्या वर्षानंतर डिप्लोमा कोर्स, दुसऱ्या वर्षानंतर अॅडव्हान्स डिप्लोमा कोर्स तर तिसऱ्या वर्षानंतर बॅचलर इन व्होकेशनल एज्युकेशन हे प्रमाणपत्र मिळेल. या नोंदणीसाठी
https://registrations.hcltechbee.com हे
संकेतस्थळ उपलब्ध आहे. आतापर्यंत 34 हजार
विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमासाठी नोंदणी केली आहे. तर या दोन्ही करारांच्या माध्यमातून सुमारे 40 हजार विद्यार्थ्यांना शिक्षण व रोजगाराची संधी उपलब्ध होणार असल्याची माहिती समग्र शिक्षा कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे.
या सामंजस्य कराराद्वारे राज्यातील विद्यार्थ्यांना
रोजगारभिमुख शिक्षणाच्या संधी उपलब्ध होणार असून स्थानिक स्तरावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. तरी, जास्तीत जास्त गरजू व इच्छुक विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन राज्य प्रकल्प संचालक कैलास पगारे यांनी केले आहे.