Take a fresh look at your lifestyle.

15 व 16 ऑक्टोबर रोजी MPSC परीक्षा असल्यामुळे जिल्हा परिषद गट-क पदभरतीच्या वेळापत्रकाला स्थगिती

0

शासन शुद्धीपत्रक:- नमूद पार्श्वभूमीवर मार्च, २०१९ व माहे ऑगस्ट, २०२१ ( अपंग व इतर सुधारित आरक्षणासह) महाभरती अंतर्गत ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा परिषद अंतर्गत गट -क मधील आरोग्य विभागाशी संबंधित ५ संवर्गातील पदभरती करण्याकरीता परिक्षा घेण्याबाबत संदर्भ क्र.४वरील दि. २६ ऑगस्ट, २०२२ च्या शासन परिपत्रकान्वये निश्चित करण्यात आलेल्या कालबद्ध कार्यक्रमास (वेळापत्रक) स्थगिती देण्यात येत आहे.

सामान्य प्रशासन विभागाच्या पदभरतीबाबत सुधारित मार्गदर्शक सूचना/निर्देश प्राप्त झाल्यानंतर याबाबत यथावकाश कळविण्यात येईल. सदरचे शासन शुद्धीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२२०९१९१५३५२०१९२० असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने सांक्षांकित करुन निर्गमित करण्यात आला आहे.