Take a fresh look at your lifestyle.

तरुणांनो नवीन उद्योग सुरु करायचा आहे? तर महाराष्ट्र शासनाच्या ‘या’ योजनेचा लाभ अवश्य घ्या

0

आपल्या मनात कुठल्याही प्रकारचा नवा उद्योग करण्याचा विचार येत असेल तर संबंधित उद्योगासाठी शासनाच्या ज्या विविध योजना आहेत त्यांच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. आज आपण ज्या योजनेबद्दल माहिती घेणार आहोत त्या योजनेचे नाव आहे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम सदर योजनेचा लाभ घेऊन तुम्ही राज्य शासनाकडून 1 लाख ते 50 लाखापर्यंत कर्ज घेऊ शकता आणि आपल्या पंखांना बळ देऊन नवी भरारी घेऊ शकता. अनेकांना कोणता ना कोणता उद्योग, व्यवसाय सुरू करण्याची आवड असतेच. परंतु नवीन उद्योग सुरू करण्यासाठी अनेक अडचणी येतात.

बेरोजगारी कमी करण्यासाठी सरकारही असे योजना आणते पण त्याची पुरेशी माहितीच नागरिकांपर्यंत पोहोचत नाही. योजना पोहोचल्या तरी त्याची पुर्तत: करण्यासाठी नाकी नऊ येतात. त्यामुळे तरुण उद्योगांकडे येत नाहीत. अशीच एक योजना आहे ती म्हणजे ‘मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम’ (सीएमईजीपी) या योजनेचा लाभ घेतला तर अनेकांना रोजगारांच्या संधी उपलब्ध होतील.

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या योजनेचा १८ ते
४५ वयोगटातील लाभ घेऊ शकतात. सरकारने रोजगार
मिळवून देण्यासाठी ही योजना आणली. उद्योग, व्यवसाय
करण्यासाठी इच्छुक असतील त्यांना ‘मुख्यमंत्री रोजगार
निर्मिती कार्यक्रम’ या योजनेतंर्गत मदत मिळू शकते.
राज्यातील सुशिक्षित, अर्धशिक्षित युवक व युवतींसाठी
स्वयंरोजगाराच्या नविन संधी उपलब्ध करून देणासाठी
महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री रोजगार निर्मीती कार्यक्रम योजना’
सुरू केला. राज्यातील सर्व जिल्ह्यासाठी ही योजना लागू
आहे.

छोट्या उद्योजकांना प्रोत्साहन देणे हा याचा उद्देश
आहे. या योजनेमुळे सर्व समावेशक विकास होण्यास मदत होईल. छोट्या उद्योगांतून देखील रोजगार निर्मिती होऊ शकते. या योजनेच्या माध्यमातून शहरी व ग्रामीण
भागातील युवा पिढीला स्वयंरोजगारासाठी उद्योग
उभारायला मदत होईल.

योजना स्तर:- “मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम”
(CMEGP) योजना ही राज्यस्तरीय योजना म्हणून तसेच
कार्यक्रमा अंतर्गत (Scheme) म्हणून अंमलबजावणी
करण्यात येईल. राज्यस्तरावर उद्योग विभागाच्या
अधिपत्याखालील उद्योग संचालनालय, मुंबई हे योजनेचे
प्रमुख अंमलबजावणी संस्था म्हणून कार्यवाही करतील.

योजनेचे उद्दिष्ट:- राज्यातील युवक-युवतींना स्वयंपूर्ण
आत्मनिर्भर बनवण्यासाठी, त्यांचे स्वयंरोजगार प्रकल्प
राज्य शासनाच्या आर्थिक सहाय्यातून सुलभतेने स्थापित
होऊन पुढील पाच वर्षात सुमारे 1 लाख सूक्ष्म, लघु
उपक्रम स्थापित होणे व त्या माध्यमातून एकूण 10 लाख
रोजगार संधी राज्यात उपलब्ध होणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे.
प्रथम वर्ष 2019-2020 साठी एकूण 10 हजार लाभार्थी
घटक उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे.

उद्दिष्टासाठी संदर्भ:- प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत जिल्हानिहाय मागील 3 वर्षांतील उपलब्धी विचारात घेऊन त्यानुसार समप्रमाणात ग्रामीण व शहरी भागांसाठी जिल्हानिहाय उद्दिष्ट उद्योग संचालनयाकडून निश्चित करण्यात येईल.

योजनेसाठी ऑनलाईन नोंदणी करा:-
ज्या तरुणांना नवीन उद्योग सुरू करायचे आहेत. त्यांनी
‘मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम’ योजनेचा लाभ
घेण्यासाठी तत्काळ खालील महाराष्ट्र सरकारच्या
अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज दाखल करावेत.
अधिकृत वेबसाईट:- https://maha-
cmegp.gov.in/Online application