शेतकऱ्यांसाठी महत्वाचे..! पीएम किसान योजनेत मोठा बदल
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत अकराव्या हप्त्याचे दोन हजार रुपये देशातील शेतकऱ्यांना केंद्र सरकारने हस्तांतरित केले आहेत. आता बाराव्या हप्त्याची शेतकरी वर्ग वाट पाहत आहे. आता लवकरच 12 व्या हप्त्याचे पैसे देशातील शेतकर्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. पण आता शेतकऱ्यांना त्याआधी सरकारने एक धक्का दिला आहे.
आता PM Kisan पोर्टलवर असणारी एक मोठी सुविधा कमी केली आहे. केंद्र सरकारने पीएम किसान सन्मान निधी योजनेत मोठा बदल केला आहे. आता शेतकरी पीएम किसान पोर्टलवर जाऊन आधार क्रमांक टाकून लाभार्थी स्टेटस पाहू शकणार नाहीत. आता सरकारने ही पद्धत बदलली आहे. आता शेतकऱ्यांना स्टेटस पाहण्यासाठी नोंदणीकृत मोबाईल क्रमांक टाकणे आवश्यक असणार आहे. पूर्वी जिथे शेतकरी त्याचा नोंदणीकृत मोबाईल क्रमांक आणि आधार कार्डच्या मदतीने लाभार्थी स्थिती पाहू शकत होता, तिथे आता आधार कार्डचा वापर बंद करण्यात आला आहे.
आता असा पाहाल लाभार्थ्यांचा स्टेटस
▪️ pmkisan.gov.in वेबसाईटवर जा.
▪️ डावीकडील लहान बॉक्समध्ये Beneficiary Status (लाभार्थी स्टेटस) वर क्लिक करा.
▪️ आता यांतनर एक नवीन पेज ओपन होईल.
▪️ तिथे तुमचा नोंदणी क्रमांक टाकून तुमचे स्टेटस चेक करा.
▪️ तुम्हाला तुमचा नोंदणी क्रमांक माहीत नसल्यास, Know Your Registration Number यावर क्लिक करा.
▪️ मग तुमच्या पीएम किसान खात्यावर तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर टाका.
▪️ यानंतर, कॅप्चा कोड भरा आणि Get Mobile OTP वर क्लिक करा.
▪️ यासोबतच बॉक्समध्ये तुमच्या नंबरवर मिळालेला OTP टाका आणि Get Details वर क्लिक करा.
▪️ आता तुमचा नोंदणी क्रमांक आणि नाव तुमच्या समोर दिसेल.