राज्य सरकारचा मोठा निर्णय; ‘या’ परीक्षा पुन्हा सुरु करणार…
राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. राज्यात 10 वर्षांपासून बंद असलेल्या तिसरी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुन्हा एकदा घेण्यास सुरुवात करणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.
महाराष्ट्रात शिक्षण हक्क कायदा (आरटीई) लागू झाल्यापासून पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे अकारिक व संकलित सातत्यपूर्ण सर्वंकष पद्धतीने मूल्यमापन केले जात होते. या विद्यार्थ्यांना नापास न करता थेट पुढच्या वर्गात प्रवेश दिला जात होता. मात्र, आता पुन्हा एकदा तिसरी ते आठवीच्या परीक्षा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.