पोलीस भरतीत NCC चा स्वतंत्र कोटा ठेवण्याची मागणी
ग्रामीण भागातील पोलीस भरती 2022 ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची मागणी आहे की पोलीस भरती प्रक्रियेत एनसीसीचा वेगळा कोटा ठेवावा.

ग्रामीण भागात महाविद्यालयीन स्तरावर एनसीसी उपलब्ध नसल्याने परीक्षेत चांगले गुण मिळवूनही उमेदवार पोलीस भरतीमध्ये मागे पडतात. त्यांना वाटते की NCC चा 7 गुणांचा बोनस शहरी उमेदवारांना पुढे ठेवतो आणि ग्रामीण उमेदवार मागे पडतो, जे ग्रामीण उमेदवारांसाठी अन्यायकारक आहे.