मनपात 350 सफाई कामगारांची भरती
बेळगाव मंत्रिमंडळ बैठकीत सोमवारी झालेल्या निर्णयामुळे बेळगाव महापालिकेत आणखी ३५० सफाई कामगारांची भरती केली जाणार आहे. राज्यातील नगर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सफाई कामगारांची रिक्त असलेली सर्व पदे भरण्यास सोमवारी मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. त्यानुसार राज्यभरातील सर्व नगर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मिळून एकूण सफाई कामगारांची ११ हजार पदे भरती जाणार आहेत.

बेळगाव महापालिकेसाठी सफाई कामगारांची ६६० पदे मंजूर आहेत. गेल्या काही वर्षांत अनेक सफाई कामगार निवृत्त झाल्यामुळे केवळ १३५ सफाई कामगार सेवेत आहेत. २०१८ साली राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार १५३ पदांची भरती प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी दाखल झालेल्या ९०० हून अधिक अर्जाची पडताळणी केली जात आहे, पण सोमवारी झालेल्या निर्णयामुळे महापालिकेला मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे आणखी ३५० सफाई कामगारांची भरती महापालिका करता येणार आहे.