Take a fresh look at your lifestyle.

गावापातळीवर नागरिकांच्या विविध शासकीय समस्या सुलभतेने होण्यासाठी ‘विशेष ग्रामसभेचे’ आयोजन करण्याबाबत शासन निर्णय जारी

0

भारत निवडणूक आयोगाकडून दरवर्षी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत अस्तित्वात असलेल्या मतदार यादीची पडताळणी व दुरुस्ती करून ती त्रुटी विरहीत करण्याचा व दिनांक ०१ जानेवारी या अर्हता दिनांकानुसार नविन मतदार नाव नोंदणी करुन मतदार यादी सुधारित करण्याचा कार्यक्रम राबविण्यात येतो.

विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम, २०२३ मध्ये दिनांक १ जानेवारी, २०२३ रोजी १८ वर्षे पूर्ण करणारे नवमतदार यांची नोंदणी करून मतदार यादी सुधारीत करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. तसेच सन २०२३ पासून दरवर्षी दिनांक १ जानेवारी, ०१ एप्रिल, ०१ जुलै व ०१ ऑक्टोंबर अशा चार अर्हता दिनांकानुसार वा त्यापुर्वी १८ वर्ष पुर्ण होणाऱ्या नागरीकांना मतदार यादीमध्ये आगाऊ नाव नोंदणी करता येणार आहे.

सदर विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत दिनांक ०९ नोव्हेंबर, २०२२ रोजी राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघातील प्रारुप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत व दिनांक ९ नोव्हेंबर, २०२२ ते दिनांक ८ डिसेंबर, २०२२ या कालावधीत दावे व हरकती स्विकारण्यात येणार आहेत. यामुळे वार्षिक संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम, २०२३ अंतर्गत दिनांक ०१ ऑक्टोंबर, २०२३ या दिनांकापर्यंत १८ वर्ष पूर्ण करणाऱ्या नवयुवकांना मतदार नाव नोंदणीसाठी ( दिनांक ९ नोव्हेंबर, २०२२ नंतर ) आगाऊ अर्ज सादर करता येणार आहेत. २०२२ ते दिनांक ८ डिसेंबर, २०२२ या कालावधीत दावे व हरकती स्विकारण्यात येणार आहेत.

यामुळे वार्षिक संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम, २०२३ अंतर्गत दिनांक ०१ ऑक्टोंबर, २०२३ या दिनांकापर्यंत १८ वर्ष पूर्ण करणाऱ्या नवयुवकांना मतदार नाव नोंदणीसाठी (दिनांक ९ नोव्हेंबर, २०२२ नंतर ) आगाऊ अर्ज सादर करता येणार आहेत. विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम, २०२३ अंतर्गत नागरिकांनी मतदार यादीतील त्यांची नोंदणी तपासणी करण्याचा व नविन मतदारांनी नाव नोंदणी करण्याचा उपक्रम तसेच मतदार यादीतील नोंदीला आधार क्रमांक जोडण्याचा उपक्रम गावातील प्रत्येक नागरिकांपर्यंत सुलभतेने पोहचावा याकरीता प्रत्येक गावामध्ये एका विशेष ग्रामसभेचे आयोजन दिनांक ९ नोव्हेंबर, २०२२ ते दिनांक ८ डिसेंबर, २०२२ या कालावधीत करण्याची विनंती प्रधान सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्याकडून करण्यात आली आहे.

या संदर्भात व्यापक योग्य ती प्रसिध्दी गावपातळीवर होईल याचीही दक्षता संबंधीत पंचायत समित्यांनी घ्यावी. याबाबतच्या प्रसिध्दीसाठीचा कंटेट जिल्हा निवडणूक अधिकारी/मतदार नोंदणी अधिकारी/सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांचेकडून उपलब्ध करून घ्यावा. याची प्रसिध्दी प्रत्यक्ष ग्रामसभेच्या १० दिवस अगोदर करावी. जेणेकरून जास्तीत जास्त ग्रामस्थांचा सहभाग वाढेल.