पुणे महानगरपालिका मेगाभरती परीक्षा ऑक्टोबर महिन्यात
पुणे महानगरपालिकेच्या मेगाभरती संदर्भात महत्त्वाची अपडेट हाती आली आहे. पुणे महापालिकेच्या मेगाभरतीसाठीची परीक्षा ऑक्टोबर महिन्यात होणार आहे. ही परीक्षा दोन ते तीन टप्प्यात होणार असल्याची माहिती समोर आली आहे. एकूण 448 जागांसाठी भरतीप्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. अर्जही मागवण्यात आले आहेत. हजारो इच्छुक उमेदवारांचे अर्ज दाखलही झाले आहेत. 448 जागांसाठी तब्बल 87 हजारपेक्षाही जास्त जणांनी अर्ज केले आहेत.
पुणे महापालिकेत मेगाभरती होणार असल्याची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर इच्छुकांकडून अर्जही मागवण्यात आले होते. ऑनलाईन, ऑफलाईन अशा पद्धतीने इच्छुकांना अर्ज सादर करता येणार होते. दरम्यान, 448 जागांसाठी एकूण 87 हजार 471 उमेदवारांनी आतापर्यंत शुल्कासहित अर्ज दाखल केले आहेत, अशी माहिती समोर आली आहे. या भरती प्रक्रियेचा महत्त्वाचा टप्पा ऑक्टोबर महिन्यात पार पडणार आहे. ऑक्टोबर महिन्यात ही भरती प्रक्रिया होईल. त्यानंतर पुढील निवड प्रक्रिया पार पडेल.
अशी असेल निवड प्रक्रिया:- या मेगाभरतीसाठी लेखी परीक्षा, त्यानंतर मुलाखत, टायपिंग टेस्ट, कागदपत्रांची पडताळणी, अशी टप्प्याटप्प्याने निवडप्रक्रिया पार पडले.
वय वर्ष 18 ते 38 वयोगटातील इच्छुक उमेदवारांना पुणे पालिकेत नोकरीची संधी चालून आली आहे.
कोरोनामुळे लांबलेली भरती प्रक्रिया आता पुन्हा सुरु झाली आहे. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांनी पुणे पालिकेत नोकरी मिळावी, यासाठी अर्ज केल्याचं पाहायला मिळालंय.