Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्र शासनाचा निर्णय; चर्मकार बांधवांना मिळणार मोफत पत्र्याचे स्टॉल

0

लगेच अर्ज करून द्या गटई कामगार योजना अंतर्गत लोखंडी पत्रा स्टॉल मिळविण्यासाठी. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने गटई कामगार योजना अंतर्गत लोखंडी पत्र्याचे स्टॉल वाटप करण्यात येणार आहे. अनुसूचित जाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना त्यांच्या उद्योग व्यवसाय चालू करण्यासाठी या लोखंडी पत्र्याचे स्टॉलचा उपयोग होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही जर अनुसूचित जाती प्रवर्गातील असाल तर लगेच अर्ज करून द्या. रस्त्याच्या कडेला काम करणाऱ्या कारागिरांना 100 टक्के अनुदान तत्त्वावर पत्र्याचे स्टॉल पुरवले जातात व 500/- रुपये रोख अनुदान देण्यात येते. चर्मकार बांधवाना त्यांच्या हक्काचे स्थान मिळण्यास मदत होते. चर्मकार बांधवांना गटई स्टॉल सोबत अधिकृत परवाना सुद्धा दिला जातो. या योजनेमुळे चर्मकार बांधवांचे उन वारा व पावसापासून संरक्षण होते कारण स्टॉल त्यांना उन,वारा आणि पावसापासून आश्रय देतात. चर्मकार बांधव त्यांच्या हक्काच्या स्टॉलमध्ये बसुन स्वतःचा उद्योग करू शकतात

गटई स्टॉल योजनेच्या काही अटी पुढील प्रमाणे:-
अर्जदार हा अनुसूचित जातीतील चर्मकार समाजाचा असावा. अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा. अर्जदाराचे वय १८ ते ५० वर्षांपर्यत असावे.
अर्जदाराने जो व्यवसाय निवडला असेल त्या व्यवसायाचे ज्ञान व अनुभव त्याला असावा.

अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न
( अ) अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागासाठी रु.९८०००/ व शहरी भागासाठी रु.१२००००/ पर्यंत असावे.
(ब) राज्य शासन पुरस्कृत योजनांसाठी शहरी व ग्रामीण भागातील उत्पन्न मर्यादा रु.१०००००/ पर्यंत असावे. जातीचा व उत्पन्नाचा दाखला तहसिलदार किंवा तत्सम सक्षम प्राधिकायाने दिलेला असावा.
अर्जदाराने या महामंडळाकडून अथवा इतर कोणत्याही शासकीय उपक्रमाकडून आर्थिक लाभ घेतलेला नसावा.महामंडळाने वेळोवेळी घालून दिलेल्या अटी व शर्ती अर्जदारावर बंधनकारक राहतील.

संपर्क कार्यालयाचे नांव:- सहाय्यक आयुक्त, जिल्हा समाजकल्याण कार्यालय