Take a fresh look at your lifestyle.

नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी मोठी बातमी; ‘महाबीज’मध्ये मेगाभरती होणार

0

महाराष्ट्रात नोकरीच्या शोधात असणाऱ्या मराठी तरुणांसाठी मोठी बातमी आहे. महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळात आगामी काही दिवसांत ‘महा भरती’ करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी केलीय. त्यामुळे शेतकऱ्यांसह बेरोजगार तरुणांनाही मोठा दिलासा मिळाला आहे.. अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना, कृषिमंत्री सत्तार यांनी ही घोषणा केली. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ महत्वाचे असून, अकोल्यात ‘महाबीज’चे मुख्यालय आहे.

अकोल्यात 28 एप्रिल 1976 रोजी ‘महाबीज’ची स्थापना करण्यात आली. बियाणे उत्पादन, प्रमाणिकरण, बियाणे गुणवत्ता नियंत्रण, बियाणे प्रक्रिया, हाताळणी, ‘पॅकेजिंग’, बियाणे विपणन, बियाणे विक्री आदी कामे ‘महाबीज’ मध्ये होतात.
महाबीज’च्या बियाण्यांत यावर्षी मोठ्या प्रमाणात तूट आढळून आली. त्याच वेळी ‘महाबीज’मधील रिक्त जागांचा मुद्दाही समोर आला आहे. अकोला दौऱ्यावर आलेल्या कृषिमंत्री सत्तार यांच्यासमोर हा प्रश्न मांडला असता, त्यांनी आगामी दिवसांतच ‘महाबीज’मध्ये ‘मेगा भरती’ करणार असल्याची घोषणा केली. पोलिस भरतीनंतर आता ‘महाबीज’मध्ये मेगाभरतीची घोषणा करण्यात आल्याने, राज्यातील बेरोजगार तरुणांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे.