इंदिरा गांधी राष्ट्रीय पेंशन योजना; जाणून घ्या संपूर्ण माहिती
योजनेची सविस्तर माहिती
1 योजनेचे नाव:- इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना
2 योजनेचा प्रकार:- केंद्र पुरस्कृत योजना
3 योजनेचा उद्देश:- राज्यातील अपंग व्यक्तींना दरमहा निवृत्तीवेतन
4 योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव:- सर्व प्रवर्गातील अपंगांना लागू आहे.
5 योजनेच्या प्रमुख अटी:- दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नोंद असलेल्या अपंग लाभार्थ्यांपैकी फक्त 18 ते 65 वर्षाखालील वयोगटातील 80% हून जास्त अपंग असलेले किंवा एक किंवा एका पेक्षा जास्त अपंग असलेले किंवा बहू अपंग असलेले (दोन किंवा त्यापेक्षा जास्त अपंग असलेल) लाभार्थी इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजनेंतर्गत निवृत्तीवेतन मिळण्यास पात्र असतात. पात्र लाभार्थ्यांना केंद्र शासनाकडून रु.200/- प्रतीमहा व राज्य शासनाकडून संजय गांधी निराधार अनुदान योजनेंतर्गत रु.400/- प्रतीमहा असे एकूण रु.600/- प्रतीमहा निवृत्तीवेतन अनुज्ञेय आहे.
6 दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरुप:- प्रतिमहा प्रतिलाभार्थी निवृत्तीवेतन रु.600/- अदा करण्यात येते.
7 अर्ज करण्याची पध्दत:- अर्जदार जिल्हाधिकारी कार्यालय/ तहसलिदार संजय गांधी योजना/तलाठी कार्यालय या ठिकाणी अर्ज करु शकतो
8 योजनेची वर्गवारी:- निवृत्तीवेतन
9 संपर्क कार्यालयाचे नाव:- जिल्हाधिकारी कार्यालय/ तहसलिदार संजय गांधी योजना/तलाठी कार्यालय