युवकांनो रोजगारासाठी कर्ज हवे; तर आताच करा ‘ग्रामोद्योगकडे’ अर्ज
युवकांना रोजगार, स्वतःचे व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (पीएमइजीपी) मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (सीएमइजीपी) अंतर्गत खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. ग्रामीण युवकांना उद्योजक बनवण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते आहे.
त्यासाठी http:// www.pmegp.online/ या संकेतस्थळावर अर्ज मागवण्यात येत आहेत. उत्पादन क्षेत्रासाठी ५०लाख, सेवा क्षेत्रासाठी २० लाखांचे कर्ज दिले जाते. तर मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत १० लाख व २५ लाखांचे कर्ज दिले जाते.