Take a fresh look at your lifestyle.

बळीराजाला समस्या व नैराश्यातून काढण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय…

0

राज्यामध्ये शेतक-यांना येणा-या अडचणी त्यातून निर्माण होणारे नैराश्य यासंदर्भात योजना तयार करणारे व ते राबवणारे अधिकारी यांना लक्षात येणे आवश्यक आहे. शेतक-यांच्या समस्या, नैराश्य व त्यातून होणा-या आत्महत्या याबाबतची कारणमिमांसा देखील समजून घेणे आवश्यक आहे.

त्या विषयाच्या चांगल्या प्रमाणात प्रशासनाच्या लक्षात येतील. त्याकरिता सुलभ व प्रभावी कृषि विषयक धोरण तयार करणे शक्य होणार आहे. विशेष करुन मराठवाडा व विदर्भ विभागातील शेतक-यांच्या नैराश्य व त्यातून उद्भवणा-या आत्महत्या याबाबतची कारणमिमांसा योग्य पद्धतीने होणे व ती प्रशासनाच्या लक्षात येणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर शेतक-यांना येणा-या अडचणी प्रश्न प्रशासनाने समजून घ्यावेत, त्यावर कोणत्या उपाययोजना करुन धोरणात्मक निर्णय घेणे आवश्यक आहे यासाठी प्रशासनातील अधिकारी, पदाधिकारी यांनी संपूर्ण एक दिवस शेतक-यांसोबत व्यतीत करुन शेतक-यांना येणा-या अडचणी समजून घेण्यासाठी “माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी हा उपक्रम राबविण्यात यावा. या अंतर्गत प्रशासनातील सर्व वरिष्ठ अधिकारी, विद्यापीठांचे शास्त्रज्ञ यांनी सकाळपासून संध्याकाळपर्यंत संपूर्ण एक दिवस शेतक-यांसोबत राहून त्यांना दैनंदिन शेतीच्या कामकाजात येणा-या अडचणीवर त्यांच्या सोबत त्यांच्या विविध कामात सहभाग घेवून चर्चा करणे अपेक्षित आहे.

परिपत्रक:- माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी या उपक्रमाची सुरुवात १ सप्टेंबर २०२२ पासून करण्यात येईल. या उपक्रमाचा कालावधी १ सप्टेंबर २०२२ पासून ते ३० नोव्हेंबर, २०२२ पर्यंत राहणार आहे.