Take a fresh look at your lifestyle.

वन्यप्राणी हल्ल्यात मृत, जखमी झाल्यास देण्यात येणाऱ्या अर्थसहाय्यात वाढ; असा करा ऑनलाईन अर्ज

0

वाघ, बिबटया, अस्वल, गवा ( बायसन), रानडुक्कर, लांडगा, तरस, कोल्हा, मगर, हत्ती व रानकुत्रे ( ढोल )
यांच्या हल्ल्यात मनुष्य हानी झाल्यास दिनांक
०२/०७/२०१०, दिनांक ३०/०३/२०१३ दिनांक
२९/०५/२०१३, दिनांक १६/०१/२०१५, दिनांक
११.११.२०१६ व दिनांक २८.११.२०१८ च्या शासन
निर्णयामधील तरतुदींनुसार अर्थसहाय्याची रक्कम
संबंधितांना अदा करण्यात येते. तसेच उक्त
वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे गाय, बैल, म्हैस, मेंढी, बकरी किंवा इतर पशुधनाचा मृत/अपंग/जखमी झाल्यास दिनांक ११/११/२०१६ च्या शासन निर्णयामधील तरतुदींनुसार अर्थसहाय्याची रक्कम संबंधितास अदा करण्यात येत आहे.

वन्यप्राणी हल्यामध्ये मनुष्य हानी तसेच पशुधन मृत/अपंग/जखमी झाल्यास देण्यात येणा-या अर्थसहाय्याची रक्कम कमी असल्यामुळे त्यामध्ये वाढ करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. तसेच मा. मंत्री ( वने), महाराष्ट्र राज्य यांनी दिलेले निर्देश,जनप्रतिनिधींकडून अर्थसहाय्यामध्ये वाढ करण्याबाबत होणारी मागणीस अनुसार वन्यप्राण्याकडुन होणा-या मनुष्यहानी व पशुधन हानी प्रकरणी देण्यात येणा-या अर्थसहाय्याचे रक्कमेत वाढ करण्याबाबत शासन पुढील प्रमाणे निर्णय घेतलेला आहे.

वन्यप्राणी हल्ल्यामुळे मृत झालेल्या व्यक्तीच्या वारसांना देय अर्थसहाय्याच्या रक्कमेपैकी रु.१०,००,०००/- (रु. दहा लक्ष फक्त ) देय असलेल्या व्यक्तीला तात्काळ धनादेशाद्वारे व उर्वरित रक्कम रु.१०,००,०००/- (रु. दहा लक्ष फक्त ) रु. ५.०० लक्ष ५ वर्षाकरिता फिक्स डिपॉझीटमध्ये ठेवावे आणि उर्वरित ५.०० लक्ष १० वर्षाकरीता फिक्स डिपॉझिट मध्ये ठेवावे. दहा वर्षांनंतर वारसांना पूर्ण रक्कम मिळेल.
वन्यप्राणी हल्ल्यामुळे व्यक्ती मृत/अपंग/जखमी झाल्यास मृत व्यक्तीच्या वारसांना अर्थसहाय्य देण्यासाठी असलेल्या इतर अटी व शर्ती शासन निर्णय, महसूल व वन विभाग क्र. डब्ल्यूएलपी १०.०८/प्रक्र.२७०/फ-१, दिनांक ०२/०७/२०१०, शासन निर्णय, महसूल व वन विभाग क्र.डब्ल्यूएलपी -२०१२/प्रक्र.३३७/फ-१, दिनांक ३०/०३/२०१३, शासन निर्णय, महसूल व वन विभाग क्र.डब्ल्यूएलपी- २०१२/प्रक्र .३३७/फ -१, दिनांक २९/०५/२०१३, व शासन निर्णय, महसूल व वन विभाग क्र. डब्ल्यूएलपी- ०७१८/प्रक्र.२६७/फ -१, दिनांक २६/०८/२०१९ प्रमाणे कायम राहिल. वन्यप्राणी हल्ल्यामुळे पशुधनाचा मृत/अपंग/जखमी झाल्यास अर्थसहाय्य देण्यासाठी असलेल्या अटी व शर्ती शासन निर्णय, महसूल व वन विभाग क्र. डब्ल्यूएलपी -०९१५/प्रक्र.३०५/फ-१, दिनांक ११/११/२०१६ प्रमाणे कायम राहिल. सदर बाबींचा खर्च वन्यप्राण्यांमुळे झालेल्या हानीसाठी नुकसान भरपाई (अनिवार्य), २४०६ २३६६ या लेखाशिर्षांतर्गत करण्यात येईल.


वन्यप्राण्यांचे हल्ल्यामुळे मनुष्यहानी व पशुधन मृत /
अपंग/जखमी झाल्यास अर्थसहाय्य/नुकसान
भरपाईसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रोसेस :
वन्यप्राण्यांचे हल्ल्यामुळे मनुष्यहानी व पशुधन मृत/अपंग/ जखमी झाल्यास अर्थसहाय्य/नुकसान भरपाईसाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा असल्यास प्रथम तुम्हाला खालील वनविभागाच्या महाराष्ट्र फॉरेस्ट पोर्टलवर भेट द्या.
https://intranet.mahaforest.gov.in/fores
tportal
अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील उपवनसंरक्षक/ उप विभागीय अधिकारी / वन क्षेत्रपाल यांचे कार्यालय या ठिकाणी संपर्क साधावा.